खाजगी शाळांनी शाळाशुल्क निश्चिती करून भरण्यास सवलत द्यावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

खाजगी शाळांनी शाळाशुल्क निश्चिती करून भरण्यास सवलत द्यावी

 खाजगी शाळांनी शाळाशुल्क निश्चिती करून भरण्यास सवलत द्यावी

अन्यथा जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून उपोषण करण्यात येईल
क्रांतिसिंह विद्यार्थी पालक संघटना, ऑल इंडिया युथ फेडरेशनचा इशारानगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर येथील महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुभाष पवार यांना आज दि.14 रोजी क्रांतिसिंह विद्यार्थी पालक संघटना आणि ऑल इंडिया युथ फेडरेशन यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन शहरातील खाजगी शाळा व्यावस्थापनाकडून शाळाशुल्क रक्कम (स्कूल फि) निश्चित करून विद्यार्थी व  पालकांना ती भरण्यास सवलत द्यावी तसेच कोणत्याही विद्यार्थ्याचा निकाल रोखून धरू नये, त्याला शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप गृपमधुन काढून टाकू नये आणि पुढील वर्गात प्रवेश देत विद्यार्थी व पालकांना दिलासा द्यावा. याबाबतचे मागणीपत्र दिले.
तसेच येत्या आठ दिवसांत याबाबींवर कार्यवाही न झाल्यास आपल्या व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर शहरातील विद्यार्थी पालकांसह मोर्चा काढून धरणे व उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. याबाबत अधिक माहिती देताना क्रांतिसिंह विद्यार्थी पालक संघटनेचे कॉम्रेड भैरवनाथ वाकळे आणि ऑल इंडिया युथ फेडरेशनचे फिरोज चाँद शेख, कॉ.दिपक शिरसाठ यांनी सांगितले कि,गेल्या दोन वर्षांपासुन जगभरात कोविड-19 च्या साथरोगाने धुमाकुळ घातलेला आहे. अहमदनगरमधेही तिच परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान झालेले आहे. नागरिकांच्या नोकर्‍या गेल्या, व्यापार धंद्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. सरकारी लॉकडाऊनमुळे सर्व शाळा प्रत्यक्षात भरणे बंद झाल्या होत्या व ऑनलाईन शिक्षण सुरू होते. गेले वर्षभर विद्यार्थी घरी राहून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. ज्या पालकांची स्मार्ट मोबाईल, लॅपटॉप घेण्याची या संकटकाळात ऐपत नाही त्यांनी कर्जभानगडी करत ते घेतले आहेत. विद्यार्थ्यांचे सध्या घरुनच शिक्षण सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाने याबाबत स्पष्ट निर्देश दिले असतानाही  अहमदनगरमधील काही खाजगी शाळांनी मागच्या वर्षी पालक व विद्यार्थ्यांकडून अवास्तव शाळाशुल्क वसुलण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही पालकांनी ते भरले तर काही पालकांनी मागच्या वर्षीचे काही शुल्क भरणे बाकी राहिलेले आहे. या शैक्षणिक वर्षात शहरातील खाजगी शाळा व्यावस्थापनाने विद्यार्थी व पालकांना शाळा अनिश्चित शुल्कासाठी मोठा तगादा लावलेला आहे. काही शाळांनी शुल्क भरल्याशिवाय रिझल्ट दिले जाणार नाही, असे मेसेज पाठवले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या गृपमधून काढून टाकले जाईल, असे कळविले आहे. आज काही विद्यार्थ्यांना गृपमधून काढून टाकून अवमान केलेला आहे. तरी आम्ही शिक्षणाधिकारी पवार साहेबांकडो मागणी करत आहोत कि, अहमदनगर शहरातील खाजगी शाळांनी कोविड-19 च्या साथरोग काळात विद्यार्थी व पालकांकडून अनिश्चित, अवास्तव शाळाशुल्क आकारू नये. विद्यार्थ्यांचे शाळा शुल्काअभावी रिझल्ट रोखू नयेत तसेच शिक्षणाधिकारी यांनी शाळाशुल्क निश्चित करून पालकांस ते भरण्यास सवलत द्यावी आणि नविन शैक्षणिक वर्षाचे प्रवेश द्यावेत.शिक्षणाधिकारी म्हणून आम्ही  मागणी करत आहोत कि, सर्व खाजगी शाळांनी त्यांची वार्षिक शैक्षणिक शुल्क रक्कम निश्चित करून त्याची एक प्रत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे व पालकांना सविस्तर कळविली पाहिजे. या मागणीपत्राद्वारे आम्ही  याबाबत त्वरीत कारवाई करण्याची मागणी करत आहोत. अहमदनगरमधील खाजगी शाळांची त्वरीत ’शुल्क निश्चिती’करणे, विद्यार्थी व पालकांना शाळाशुल्क भरण्यास सवलत देणे व नविन वर्षाचे प्रवेश त्वरीत देणे.वरील मागण्या तातडीने  आठ दिवसांत मान्य न झाल्यास आम्ही विद्यार्थी व पालकांसह लोकशाही मार्गाने शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन, उपोषण करणार आहोत. याची नोंद घेऊन शिक्षणाधिकारी यांनी त्वरीत कार्यवाही करून विद्यार्थी पालकांना दिलासा द्यावा.
या द्वारे आम्ही शहरातील विद्यार्थी व पालकांना आवाहन करत आहोत कि आप्लाय पाल्याबाबत कोणत्याही खाजगी शाळा व्यवस्थापनाने शाळाशुल्का अभावी (स्कूल फि) गैरवर्तणुक केली असल्यास क्रांतिसिंह विद्यार्थी पालक संघटना - 9405401800 व ऑल इंडिया युथ फेडरेशन -  च्या या नंबरवर तक्रार द्यावी. आम्ही आपल्यावतीने सरकार दरबारी न्याय मिळविण्यासाठी लढू.या शिष्टमंडळात कॉ.तुषार सोनवणे, कॉ.अमोल चेमटे, तसेच कॉ.राजु नन्नवरे यांचा समावेश होता. या प्रश्नाच्या चर्चेसाठी शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण तसेच अरूण पालवे सरांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment