भाळवणी कोविड सेंटरमध्ये वटपौर्णिमा साजरी .. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 25, 2021

भाळवणी कोविड सेंटरमध्ये वटपौर्णिमा साजरी ..

 भाळवणी कोविड सेंटरमध्ये वटपौर्णिमा साजरी ..नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

वटपौर्णिमेनिमित्त आज पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आमदार निलेश लंके यांच्या श्री शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर या ठिकाणी सर्व कोविड सेंटर मधील महिलांना एकत्र करून   आमदार निलेश लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे यांनी स्त्रियांच्या सौभाग्याचं प्रतीक असलेला  हिंदू धर्मातील पवित्र असा वटसावित्रीचा सन वटपोर्णिमा आज साजऱी करण्यात आली  यावेळी कोरोना सारख्या आजाराला विसरून भाळवणी कोविड सेंटर मध्ये महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यावेळी महिलांनी त्याठिकाणी  वटपौर्णिमेनिमित्त वड या वृक्षाचे पूजन करून आपल्या सौभाग्याचा सण साजरा केला.  यावेळी उखाणे घेण्याचा कार्यक्रमही उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी या ठिकाणी  महिलांनी दांडिया ही खेळण्याचा आनंद घेतला. तसेच  महिलांनी यावेळी  भक्ती गीते अभंग गवळणी यांचे गायन ही केले. यावेळी श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर कोरोना सेंटर भाळवणी येथे आनंदमय वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी महिला प्रतिक्रिया देताना  असे म्हणाल्या की कोरोनाच्या काळात आमच्यावर आलेले हे संकट दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला आमचं दुःख विसरून आम्ही हा सण या ठिकाणी साजरा केला आहे. आज हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here