हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेची ऑनलाईन शाळेस सुरूवात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 16, 2021

हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेची ऑनलाईन शाळेस सुरूवात

 हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेची ऑनलाईन शाळेस सुरूवात

हिंद सेवा मंडळाच्या बगडपट्टीतील प्राथमिक शाळेच्या ऑनलाईन शाळा कामकाजास मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी सरस्वती पूजनाने सुरूवत केली. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जून महिन्यात नवे शैक्षणिक वर्षास सुरूवात होऊन सर्व शाळा सुरु होत असतात. मात्र करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसर्‍या वर्षी सर्व शाळा बंद आहेत. हिंद सेवा मंडळाच्या बगडपट्टीतील प्राथमिक शाळेत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शाळेस सुरूवात केली आहे. शाळेत विद्यार्थी नसले, तरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेची आकर्षक सजावट करून व रांगोळ्या रेखाटून सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी विद्येची देवता सरस्वती पूजनाने शालेय कामकाजास सुरूवत केली. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शाळेस सुरवात झाली आहे. मागच्या वर्षीही शिक्षकांनी ऑनलाईन ्द्वारे साध्या व सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे ज्ञान दिले होते. मुलांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये म्हणून जोवर शासन दैनदिन शाळा सुरु करत नाही तोवर याही वर्षी ही शाळा याच पद्धतीने ऑनलाईन चालणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here