अनाथ मुले आपल्या समाजातील एक घटक -क्षितीज झावरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 16, 2021

अनाथ मुले आपल्या समाजातील एक घटक -क्षितीज झावरे

 अनाथ मुले आपल्या समाजातील एक घटक -क्षितीज झावरे

यतिमखाना येथील विद्यार्थ्यांना रोटरी मिडटाऊनच्या वतीने शालेय शूजचे वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रोटरी मिडटाऊनच्या वतीने शहरातील यतिमखाना येथे शिक्षण घेणार्या अनाथ मुलांना शालेय शूजचे वाटप करण्यात आले. शाळा नुकतीच ऑनलाईन सुरु झाली असली तरी, यतिमखाना येथे वास्तव्यास असलेल्या मुलांना रोटरीच्या वतीने मदत देण्यात आली. यावेळी रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष क्षितीज झावरे, सहाय्यक प्रांतपाल अभय राजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डोंगरे, यतिमखाना संस्थेचे विश्वस्त हाजी निजाम बागवान, उबेद शेख, रोटरी इंटीग्रिटीचे अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी आदी उपस्थित होते.  
क्षितीज झावरे म्हणाले की, अनाथ मुले आपल्या समाजातील एक घटक असून, त्यांना मदत करण्यासाठी रोटरीचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. शिक्षणाने परिस्थितीत बदल घडणार असून, मुलांनी न्यूनगंड न बाळगता उच्च शिक्षण घेऊन ध्येय प्राप्त करण्याचे त्यांनी आवाहन केले. अभय राजे यांनी वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी रोटरीचे कार्य सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी रोटरी कटिबध्द असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविकात उबेद शेख यांनी सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून यतिमखाना चालत आहे. या संस्थेसाठी रोटरीचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. परिस्थितीतून घडलेला व्यक्ती यशाच्या उंच शिखरावर जात असतो. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ते साकारण्यासाठी परिश्रम घेतल्यास त्याला निश्चित यश मिळणार आहे. पैसा ही गौण बाब असून, परिश्रम व कष्ट करण्याची तयारी असल्यास जीवनात यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्सार शेख यांनी केले. आभार अहमदनगर हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका शायदा सय्यद यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here