गुणी कलाकारांना प्रोत्साहन दिल्यास तेही यश मिळवू शकतात - अवधूत गुप्ते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 16, 2021

गुणी कलाकारांना प्रोत्साहन दिल्यास तेही यश मिळवू शकतात - अवधूत गुप्ते

 गुणी कलाकारांना प्रोत्साहन दिल्यास तेही यश मिळवू शकतात - अवधूत गुप्ते

श्री विशाल गणेश मंदिरात अवधुत गुप्ते यांच्या हस्ते आरती


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रत्येक कार्याची सुरुवात ही श्रीगणेशाला वंदन करुन करण्यात येते. आपणही प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात श्रीगणेश पूजनाने करतो. विविध दौर्यानिमित्त फिरत असतांना त्या ठिकाणच्या मंदिरांना भेटी देत असतो. आज नगरमध्येही आल्यावर श्री विशाल गणेशाचे दर्शन घेऊन धन्य पावलो आहे. नगरच्या सन्मिता धापटे हिसही या श्रीगणेशाचे आशिर्वाद लाभले असतील, म्हणूनच  महागायिका ठरलेल्या आहेत.  मंदिरातील सुबक नक्षीकाम हे मंदिराच्या वैभवात आणखीच भर पडलेली आहे. मंदिराचा झालेले विकास हा नेत्रदिपक असून, भव्य मुर्ती पाहून आपणास समाधान लाभले आहेत. छोट्या शहरातही अनेक गुणी कलाकार आहेत. या कलाकारांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यांना प्रोत्साहन मिळाल्यास तेही मोठे यश मिळवू शकतात हे सन्मिता धापटे यांनी मिळविलेल्या यशावरुन दिसून येते, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधुत गुप्ते यांनी केले.
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधुत गुप्ते यांनी भेट देऊन आरती केली. याप्रसंगी महाराष्ट्राची महागायिका सन्मिता धापटे-शिंदे, देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, सचिव अशोक कानडे, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, व्याख्याते गणेश शिंदे, राजू एकाडे, गणेश राऊत आदि उपस्थित होते.
यावेळी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, श्री विशाल गणेशाच्या आशिर्वादाने अनेकांची मनोकामना पुर्ण होत असतात. नगरचा अभिमान असलेल्या सन्मिता धापटे यांनी मिळविलेले यश हे नगरकरांसाठी अभिमानास्पद असेच आहे. या माध्यमातून नगरचे नाव सर्वत्र चमकले आहे, अवधूत गुप्ते सारख्या ज्येष्ठ गायक-संगीतकारांचे मोलाचे मार्गदर्शन नगरकरांना मिळत असल्याने भविष्यात नगरमधील कलाकार आणखी मोठा मंच गाजवतील, असे सांगितले. यावेळी अशोक कानडे यांनी उपस्थितांना मंदिराच्या कार्याची माहिती दिली. यावेळी अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांच्या हस्ते मान्यवरांचा श्री विशाल गणेशाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here