आजपासून आठ आरोग्यकेंद्रांवर लसीकरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 4, 2021

आजपासून आठ आरोग्यकेंद्रांवर लसीकरण

 आजपासून आठ आरोग्यकेंद्रांवर लसीकरण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  आजपासुन महात्मा फुले आरोग्य केंद्र, तोफखाना आरोग्य केंद्र, सावेडी आरोग्य केंद्र, केडगाव आरोग्य केंद्र, आयुर्वेद आरोग्य केंद्र, नागापूर आरोग्य केंद्र
भोसले आखाडा आरोग्य केंद्र, मुकुंदनगर आरोग्य केंद्र या आठ आरोग्य केंद्रांवरच लस दिली जाणार आहे. या केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी 100 डोस उपलबध करून दिले जाणार आहेत. महापालिकेने प्रभागनिहाय सुरू केलेली लसीकरण तात्पुरती बंद केले आहे. शहरात सातत्याने लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे.तसेच अनेक ठिकाणी नागिरकांची होणारी धावपळ पाहता प्रभानिहाय लसीकरण केंद्रांची मागणी करण्यात आली होती.नगरसेवकांच्या मागणीनुसार महापालिकेने शहरातील विविध भागात 20 नवीन उपकेंद्र सुरू केली होती. या केंद्रांवर लसीकरण करण्यात येत होते.परंतु लसी कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आयुक्तांनी मनपाच्या 8 आरोग्य केंद्रांवर लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्याने लसीकरणाचा पुरता गोंधळ उडाला होता.महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी केवळ मनपाच्या आठ उपकेंद्रांवरच लसीकरण करण्याचा आदेश दिला. त्यामुळे शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर केले जाणारे लसीकरण बंद करण्यात आले असून, मनपाच्याच आरोग्य केंद्रातच लसीकरण केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment