बेकरी दुकाने बंद का? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 4, 2021

बेकरी दुकाने बंद का?

 बेकरी दुकाने बंद का?

नगरमधील बेकरी उत्पादकांचे जिल्हाधिकारी व उपायुक्त यांना निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यातील अनेक जिल्ह्यात  परवानगी असताना फक्त अहमदनगरमधील बेकरी बंद का ? बेकरीमध्ये बनवलेली सर्व उत्पादने मेडीकल, किराणा डेअरी मध्ये उघडपणे विकली जात आहेत, मग आमच्या बेकरी दुकानांमध्ये आमची उत्पादने विक्रीपासून का दूर ठेवली जातात.
नगरमध्ये बेकरी दुकान चालू ठेवण्यास परवानगी मिळावी असे निवेदन जिल्हाधिकारी व उपायुक्त प्रदीप पठारे यांना नगरमधील बेकरी उत्पादन विक्रेत्यानी दिले. यावेळी कराचीवाला बेकरीचे विनोद कराचीवाला,दत्त बेकरीचे मानसिंग परदेशी,जलाराम बेकरीचे नकुल चंदे, बेस्ट बेकरीचे फर्मान शेख, कबीर बेकरीचे राजन चेमटे आदी उपस्थित होते
जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या आदेशामध्ये बेकरी उत्पादनांचा आवश्यक सेवांमध्ये समावेश आहे. पण जिल्हाधीकार्‍यांच्या आदेशानुसार आजपर्यंत नगर मध्ये बेकरी दुकानांना परवानगी नाही. इतर सर्व जिल्ह्यात परवानगी आहे. आम्ही ऑर्डरचे पालन केले आणि आजपर्यंत आमची बेकरी बंद ठेवली आहे. आता आमची दुकाने 1 1/2 महिना झाला बंद आहे. आमच्या कामगार आणि कर्मचार्यांना वेतन देणे देखील कठीण जात आहे.उलट महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांनी बेकरी दुकांनाना चालू ठेवण्यास परवानगी होती, आणि अजूनही बेकरीची सर्व उत्पादने शेजारच्या इतर जिल्ह्यांमधून अहमदनगर शहरात येत आहेत, जे किराणा , सुपर मार्केट, डेरी इत्यादी मध्ये पुरवठा आणि विक्री केली जातात. बेकरी माल जर मेडिकल, डेअरी, आणि किराणा दुकानात विक्री करण्यास परवानगी आहे तर आमच्या बेकरी दुकांन चालू ठेवण्यास आणि विक्री करण्यास परवानगी का नाही ?
महाराष्ट्र शासनाने नमूद केल्याप्रमाणे आमची बेकरी उत्पादने पाव, ब्रेड, बटर, टोस्ट देखील आवश्यक सेवांमध्ये आहेत. दुसरे म्हणजे ते गरीब लोकांसाठी उपलब्ध असलेले खाद्य खाण्यास स्वस्त असतात. ही उत्पादने बेकरीमध्ये तयार केली जातात आणि ती सध्या शेजारच्या जिल्ह्यातून पुरविली जातात. जेव्हा बेकरीमध्ये बनवल्या जाणार्या उत्पादनांना किराणा व दुग्धशाळेच्या नावाखाली सुपरमार्केटमध्ये विक्री करण्यास परवानगी दिली जाते, आमच्या बेकरीच्या दुकानात तीच उत्पादने विकण्याची परवानगी का नाही? कृपया वरील कारणास्तव आम्हाला लवकरात लवकर परवानगी दयावी असे निवेदन बेकरी उत्पादक आणि विक्रेते, विनोद काराचीवाला, मानसिंग परदेशी, नकुल चंदे, फर्मान शेख, आणि राजन चेमटे यांनी जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना दिले.

No comments:

Post a Comment