डॉक्टरकडुन उपचारात हलगर्जीपणा; एकाचा मृत्यू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 4, 2021

डॉक्टरकडुन उपचारात हलगर्जीपणा; एकाचा मृत्यू

 डॉक्टरकडुन उपचारात हलगर्जीपणा; एकाचा मृत्यू

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रूग्णावरील उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत सक्कर चौकातील भोसले हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र भोसले यांच्याविरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार गणेश भगवान नागरगोजे यांनी फिर्याद दिली आहे. सिव्हील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी पी. एल. सायगावकर यांनी गुन्हा दाखल करण्याचा अहवाल पोलिसांना दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भोसले हॉस्पिटलमध्ये योगेश सुरेश भोसले (रा. वाकोडी ता. नगर) यांच्यावर 18 ते 20 डिसेंबर 2018 दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी मयत योगेश यांच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली होती. यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. सायगावकर यांनी चौकशी करून योगेश यांचा मृत्यू उपचारात हलगर्जीपणा केल्याने झाल्याचा निष्कर्ष काढला. डॉ. सायगावकर यांनी तसा अहवाल भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 1 जून रोजी दिला. प्राप्त अहवालावरून डॉ. भोसले यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेंडकोळी करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here