कोविड काळात वसुंधरा मातेचा निरोप घेणार्‍यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 7, 2021

कोविड काळात वसुंधरा मातेचा निरोप घेणार्‍यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

 कोविड काळात वसुंधरा मातेचा निरोप घेणार्‍यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

एक वृक्ष, एक मित्र समितीची केडगावला स्थापना


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अ.नगर महापालिका उद्यान विभाग व प्रभाग 17चे विद्यमान नगरसेवक व माजी सभापती मनोज कोतकर यांच्या सहकार्याने केडगावमधील मोहिनीनगर येथील मोकळ्या भूखंडावर वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास अजय कोतकर, बाळासाहेब कोतकर उपस्थित होते.
यावेळी श्री. मनोज कोतकर म्हणाले की, परिसरातील नागरिकांनी असाच एकोपा ठेवल्यावर आम्हाला काम करण्यास आनंद वाटतो. या ओपन स्पेस 212/1 व 212/2 मध्ये एक आधुनिक उद्यान साकारणार असल्याचे सांगितले.
या निमित्ताने एक वृक्ष, एक मित्र समितीच्या स्थापना करून वृक्षारोपणाची मोहीम लोकसहभागातून करण्याचे व फक्त झाडे लावून फोटोसेशन न करता आयुष्यभर झाडांचे संवर्धन करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली. कोविड काळात ऑक्सिजनअभावी अनेकांनी या वसुंधरा मातेचा निरोप घेतला. मोहिनीनगरमधील नागरिकांनी पुढील पिढ्यांसाठी व भविष्यातील पर्यावरणाचा विचार करून जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस वा अन्य कोणत्याही आनंदप्रसंगी अनावश्यक खर्च टाळून झाडे लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
परिसरातील अनेक नागरिकांना कोविडमुळे आपला जीव गमवावा लागला. या सर्वांच्या व कै. सुनील वायकर यांच्या स्मरणार्थ ‘1-वृक्ष, 1-मित्र समिती’ सदस्य बाबासाहेब वायकर यांनी वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेचा वसा घेतला. हा वसा एकट्याने न करता सर्व परिसरातील नागरिकांनी अंगावर घेऊन पुढे चालण्याचा मानस यावेळी केला. वृक्षाचे रोपण केल्यानंतर पुढील वर्षी झाडांची वाढ किती झाली, त्याचा विचार करून संगोपन करणार्यास बक्षीसरूपी रक्कम देण्याचे यावेळी समिती सदस्यांनी जाहीर केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण ठोंबरे, गणेश ठोंबरे, सागर बडे, अभिजीत नलवडे, उमेश ठोंबरे, सुरेंद्र दराडे, केतन कळमकर, प्रसाद ठोंबरे, फुंदे, भरत भंडारी, विजय शिंदे, रमण घोडेराव, नवनाथ घोडे, परदेशी, घनश्याम बांडे, रामेश्वर ढगे, बाबासाहेब वायकर आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी डॉ. शांतीलाल कटारिया व इंजि. प्रसाद आंधळे यांनी विशेष सहकार्य केले.

No comments:

Post a Comment