डॉ. लंके यांची आयुर्वेदिक उपचार प्रणाली ठरतेय कोरोना रुग्णांसाठी प्रभावी ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 7, 2021

डॉ. लंके यांची आयुर्वेदिक उपचार प्रणाली ठरतेय कोरोना रुग्णांसाठी प्रभावी !

 डॉ. लंके यांची आयुर्वेदिक उपचार प्रणाली ठरतेय कोरोना रुग्णांसाठी प्रभावी !

300 पेक्षा जास्त कोरोना रूग्ण आयुर्वेदिक उपचाराने केले कोरोनामुक्त !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तालुक्यातील वडगाव गुंड येथील डॉ.अजित लंके यांचे देविभोयरे येथे ओम हॉस्पिटल आहे.डॉ.लंके हे आयुर्वेदिक उपचार प्रणालीसाठी पारनेर तालुक्यात प्रसिद्ध आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत डॉ.लंके यांनी 300 पेक्षा जास्त कोरोना रूग्ण आयुर्वेदिक उपचाराने कोरोनामुक्त केले आहेत. शासन नियमानुसार सर्व रुग्णांना शासकीय कोविड सेंटर मध्ये ठेवले व आयुर्वेदिक तुलसी इम्म्युन सह इतर औषधं घेण्याचा सल्ला दिला.या सर्व रुग्णांना आयुर्वेदिक औषधबरोबर गरम पाण्याची वाफ घेणे, कोमट पाण्याच्या गुळण्या करणे, कफ तेल व मीठ सकाळी आंघोळीच्या आधी छातीला मसाज करून कडक पाण्याने आंघोळ करणे, सुंठ व पाण्याचा छातीला लेप देणे, दीर्घ श्वसन, प्राणायाम हे सर्व नियमित चालू ठेवणे या गोष्टीवर भर दिला.
या सर्व गोष्टी नियमित केल्यामुळे छातीमध्ये कफ साठून राहत नाही, तो पातळ होऊन बाहेर पडतो. यामुळे उढ डउजठए वाढत नाही व कोरोना सारखा गंभीर आजार सहजरीत्या बरा होतो.
या उपचारबरोबरच सर्व रुग्णांना कोविड सेंटर मधेच ऍडमिट करून पुढील संसर्ग थांबवण्यासाठी रुग्णांचे प्रबोधन केले.
गंभीर स्थितीतील कोरोना रूग्णांवर अ‍ॅलीओपॅथी उपचार पद्धतीत फॅबीफ्ल्यु गोळ्या व रेमडिसीवर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.परंतु या औषधांच्या अतिवापरामुळे शरीरावर घातक परिणाम होत असुन , त्यामुळे अनेक रूग्णांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे.माञ डॉ.अजित लंके यांनी कोरोना रूग्णांवर आयुर्वेदिक औषधांचा वापर करून यशस्वी उपचार केले आहेत.पारनेर तालुक्यातील शेकडो कोरोना रूग्ण कोरोनामुक्त   केले तर आहेच तर पुण्यातील डॉ.घनशाम मर्दा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ लंके सहित राज्यातील त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी 1000 पेक्षा जास्त रूग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत.
या उपचार पद्धतीमुळे रुग्णाची ऑक्सिजन पातळी खालावत नाही तसेच या उपचार पद्धतीचा अवलंब केल्यास ऑक्सिजन चा जो तुटवाडा निर्माण झाला होता तशी आणीबाणी ची परिस्थिती निर्माण होणार नाही अशी खात्री डॉ लंके यांनी दिली.
डॉ.लंकेंच्या आयुर्वेदिक उपचार प्रणालीमुळे कोरोना रोगावर यशस्वी मात करता येतं असल्याने त्यांच्याकडे अहमदनगर , पुणे , कोल्हापूर आदी जिल्ह्यातील अनेक रूग्ण उपचार घेण्यासाठी येऊ लागले आहेत.
या निमित्ताने शासनाने आयुर्वेदिक उपचार पद्धती कोरोना उपचारच्या प्रोटोकॉल मध्ये सहभागी करावी व रुग्णांना त्याचा लाभ मिळावा अशी विनंती डॉ लंके यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here