जनसंकल्प फाऊंडेशनच्यावतीने वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 7, 2021

जनसंकल्प फाऊंडेशनच्यावतीने वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा

 जनसंकल्प फाऊंडेशनच्यावतीने वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्त्य साधून जनसंकल्प फाउंडेशनच्या वतीने नगर जिल्ह्यातील नेवासा श्रीगोंदा आणि राहुरी तालुक्यात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी नेवासा तालुका परिसरातील श्री जगदंबा खांडेश्वरी माता देवस्थान येथे पक्ष्यांसाठी पाणपोई उभारत त्यांच्या खाद्याची देखील सोय करण्यात आली. यावेळी देवस्थानचे मठाधिपती महंत ह.भ.प. गणेशानंद महाराज तसेच फाउंडेशनचे नेवासा तालुका अध्यक्ष रामेश्वर गणगे, उपाध्यक्ष अभिषेक ताकवणे, कार्याध्यक्ष सुरज मंडलिक, सचिव शिवप्रसाद मांढरे, सोशल मीडिया प्रमुख अनिकेत उंदरे, जैद शेख, सुनील गोंधळे, गौरव ताकवणे, गणेश आढाव आदी उपस्थित होते.
फाउंडेशनच्या वतीने श्रीगोंदा येथे  देखील पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्रीगोंदा परिसरात वडाचे झाडे लावण्यात आले आणि जुन्या झाडांचे संवर्धन करून नवीन व जुन्या झाडांचे सवर्धन करण्याची शपथ घेतली गेली. यावेळी फाऊंडेशनचे नगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री.आकाश  ढगे,  श्रीगोंदा तालुका अध्यक्ष गणेश कांबळे, कामठी गावचे उपसरपंच शिवाजी खेंडके, सामाजिक कार्यकर्ते राजू तोरडे, ग्रामपंचायत सदस्य परसराम शिंदे, देविदास तोरडे हे उपस्थित होते. किरण गोलवाड. दिपक गोलवाड, शिवाजी गोलवाड,किशोर गोलवाड,तुषार गोलवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या व्यतिरिक्त राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी गावामध्ये देखील वृक्षारोपण करण्यात आले. तसेच तालुक्यातील महादेव आणि जगदंबा देवी मंदिराच्या परिसरातही जुन्या झाडांचे संवर्धन करून  सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली. यावेळी वृक्ष संवर्धनाची शपथ विधी पार पडला. यावेळी फाऊंडेशनचे राहुरी तालुका अध्यक्ष अजित वने, सुरज भालेराव, इम्रान शेख, राम हराले, समिर शेख, रोहित सावंत, विकास साठे, तेजस तेलोरे, रोहित वाकडे  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment