एलसीबीची मोठी कारवाही... सहा वर्षापासून फरार असलेले आरोपी जेरबंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

एलसीबीची मोठी कारवाही... सहा वर्षापासून फरार असलेले आरोपी जेरबंद

एलसीबीची मोठी कारवाही...

सहा वर्षापासून फरार असलेले आरोपी जेरबंदनगरी दवंडी

नगर - दरोड्याचे गुन्ह्यामध्ये मागील सहा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीसह वांबोरी घाटामध्ये वाहन चालकांना अडवुन लुटमार करणारे आरोपी  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आणि कोणी उघड होण्याची शक्यता आहे. 

आरोपी मध्ये विकास बाळू हनवत, वय-२४ वर्षे, रा. पाण्याचे टाकी जवळ, कात्रड, ता. राहूरी,सतिष अरुण बर्डे, वय २८ वर्षे, रा. कात्रड, ता. राहूरी,  सागर शिवाजी जाधव, वय ३० वर्षे, रा. कात्रड, ता. राहूरी यांचा समावेश आहे.दिनांक २३ एप्रिल रोजी फिर्यादी . रितीक प्रेमचंद छजलानी वय २० वर्ष रा. पंचशीलनगर, भिंगार हे त्याचे मित्रासह गोरक्षानाथ गड, मांजरसुंबा येथे त्यांची मोटार सायकल नंबर एमएच-१६ सीबी ३३२८ हि वरुन वांबोरी फाटा मार्गे जात असतांना गोरक्षनाथ गडाचे चढावर मोटार सायकलचा वेग कमी झाला त्यावेळी घजालानी यांच्या समोरुन दोन व पाठीमागुन दोन असे एकुण ४ अज्ञात इसम दोन मोटार सायकल वरुन त्यांच्या जवळ आले व  त्याचे मित्रास मारहाण करुन घजालानी  व त्याचा मित्राजवळील ३ मोबाईल व सोने चांदीचे दागीणे असा एकुण १,१६,५०००/ रु. किमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता.सदर घटने बाबत  एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गुरनं. २५४/२०२१ भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक . अनिल कटके, हे त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर गुन्ह्याचा समांतर करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणून सदर गुन्ह्यात यापुर्वी आरोपी  विकास बाळू हनवत, वय-२४ वर्षे, रा. पाण्याचे टाकी जवळ, कात्रड, ता. राहूरी, करण नवनाथ शेलार, वय १९ वर्षे, रा. विटभट्टीजवळ, मोरे चिंचोरे, ता. नेवासा व एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेवून एमआयडीसी पो.स्टे. ला हजर केलेले होते.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुरेश निकम, रा. कात्रड, ता. राहूरी हा फरार झालेला होता. सदर फरार आरोपीचा . अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, हे त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने शोध घेत असताना पोनि  अनिल कटके यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली कि, आरोपी सुरेश निकम हा कात्रड येथे त्याचे घरी आला असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. आरोपी रहात असलेल्या परिसरात सापळा लावला असता सदर आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागल्याने तो पळून जावू लागला. त्यावेळी पथकातील  पोलीसानी आरोपीचा पाठलाग करुन आरोपी   सुरेश रणजित निकम, वय ३० वर्षे, रा. कात्रड, ता. राहूरी यास ताब्यात घेतले. 

त्यास विश्वासात घेवून सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास अधिक विश्वसात घेवून कसून व सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा यापुर्वी अटक करण्यात आलेले वरील असलेले साथीदार तसेच सतिष बर्डे व सागर जाधव, दोघे रा. कात्रड, ता. राहूरी अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने त्यावरुन आरोपींचा शोध घेवून आरोपी   सतिष अरुण बर्डे, वय २८ वर्षे, रा. कात्रड, ता. राहूरी,  सागर शिवाजी जाधव, वय ३० वर्षे, रा. कात्रड, ता. राहूरी यांना ताब्यात घेवून एमआयडीसी पो.स्टे. येथे हजर केले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई  गणेश इंगळे, पोहका  दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोना  सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, संदीप पवार, दिनेश मोरे, दिपक शिंदे, पोकॉ मच्छिन्द्र बर्डे, रविन्द्र घुंगासे, संदीप दरंदले, योगेश सातपूते, जालिंदर माने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील कार्यवाही एमआयडीसी पो.स्टे. करीत आहेत.वरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द यापुर्वी दरोडा, जबरी चोरी या सारखे खालील प्रमाणे गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यात अद्याप पावेतो फरार आहे.

आरोपी सुरेश रणजित निकम याचे विरुध्द गुन्हे दाखल  असून एमआयडीसी पो.स्टे. गुरनं. २१०/२०१५ भादवि कलम ३४१, ३९४, ३९५, ३९७ (फरार) २१५/२०१५ भादवि कलम ३९४, ३९५, ३९७ (फरार),एमआयडीसी पो.स्टे.  एमआयडीसी पो.स्टे.  सोनई पो.स्टे. गुरनं. येथे दाखल आहे.आरोपी सतिष अरुण बर्डे याचे विरुध्द एमआयडीसी पो.स्टे..,राहूरी पो.स्टे. येथे विविध प्रकारचे गुन्हा दखल आहे.

आरोपी सागर शिवाजी जाधव याचे विरुध्द दाखल गुन्हे एमआयडीसी पो.स्टे. ,एमआयडीसी पो.स्टे. गुरनं.,पारनेर पो.स्टे. गुरनं.  राहूरी पो.स्टे. गुन्हा दाखल केले आहे.

सदरची कारवाई .  पोलीस अधीक्षक मनोज पाटिल , सौरभ कूमार अग्रवाल , अपर पोलीस अधीक्षक, ,  अजित पाटील , उपविभागीय पोलीस अधीकारी, नगर ग्रामीण विभाग, .नगर यांचे सुचना 

No comments:

Post a Comment