कोरोनाच्या सर्व नियमाचे व्यापारी तंतोतंत पालन करणार - शिवाजी चव्हाण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 7, 2021

कोरोनाच्या सर्व नियमाचे व्यापारी तंतोतंत पालन करणार - शिवाजी चव्हाण

 कोरोनाच्या सर्व नियमाचे व्यापारी तंतोतंत पालन करणार - शिवाजी चव्हाण

दुकाने सुरू करण्यासंदर्भात सावेडी उपनगरातील व्यापार्‍याची बैठक संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या दीड वर्षापासून कोविड संकटकाळात सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनने सरकार व प्रशासनास सहकार्य केले आहे.आपला व्यवसाय बंद ठेऊन कोरोनाच्या अटी व शर्तीचे पालन केले आहे. व्यापारी हा समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे,शासनाने आज पासून सर्व व्यवसाय व  बाजारपेठा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनच्यावतीने उपनगर भागातील व्यापार्‍यांची बैठक घेऊन सर्वांनी कोरोनाचे नियमाचे पालन करावे मास्क व सोशल डिस्टंसिंग तसेच सॅनिटीजरचा वापर करावा आदी सर्व नियमांचे पालन करून ग्राहकांमध्ये कोरोना बाबत जनजागृती करावी अशी माहिती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पै.शिवाजी चव्हाण यांनी केले.
सावेडी उपनगर भागातील व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयोजित बैठकीत बोलताना अध्यक्ष पै.शिवाजी चव्हाण,उपाध्यक्ष संतोष भोजने, सचिव प्रमोद डोळसे, खजिनदार केतन बाफना, सहसचिव पारस कटारिया, सदस्य मंगेश निसळ, यश शहा, दिनेश सापा,आतिष गांधी, प्रसाद कुलकर्णी, विपुल छाजेड, संतोष कल्याणकर, अविनाश गुंजाळ, अशोक पाटसकर, लक्ष्मीकांत चिकटे, कैलास भोगे, नंदू शिवगजे, रावसाहेब चव्हाण, शरद बोरुडे, सुजित अष्टेकर, राजू मानवेळीकर, प्रवीण कुलाळ, किशोर मुथा, आनंद पवार आदी व्यापारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष पै.शिवाजी चव्हाण म्हणाले की, कोरोनाच्या संकट काळामध्ये व्यापार्‍यांनी गेल्या दीड वर्ष सामाजिक भावनेतून विविध उपक्रम राबवले गरजूंना मदतीचा हात दिला, आपले उद्योग धंदे ठप्प असतानाही नगर मध्ये विविध उपक्रम व्यापारी वर्गाने राबवली पण काही नागरिक ऑनलाइनद्वारे आपली खरेदी करत आहे परंतू या परदेशी कंपन्याने या कोरोनाच्या संकट काळात कुठलीही मदत केली नाही परंतु व्यापार्‍यांनी आपला व्यवसाय उद्योगधंदे बंद असतानाही सामाजिक दृष्टिकोनातून पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले. यासाठी नागरिकांनी आपल्या जवळीन व्यापार्‍यांकडूनच खरेदी करावी तसेच व्यापार्‍यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी शहराचे आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर नेहमीच सहकार्य करत असतात या सर्वांनी नगर शहरातील उद्योगधंदे सुरू करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरवठा केला असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here