कोरोनामुळे पर्यावरणाचे महत्व समजले : शशिकांत नजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 7, 2021

कोरोनामुळे पर्यावरणाचे महत्व समजले : शशिकांत नजन

 कोरोनामुळे पर्यावरणाचे महत्व समजले : शशिकांत नजन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सीजनचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवला. देशात ऑक्सीजन प्राणवायू निर्मीती प्रकल्प उभारणीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च होत आहे. या उलट झाडे आपल्याला अहोरात्र मोफत प्राणवायु उपलब्ध करुन देतात. ही सर्व परिस्थिती पाहता कोरोनामुळे पर्यावरणाचे, झाडांचे व प्राणवायूचे महत्व सर्वांनाच समजले आहे, असे प्रतिपादन महानगर पालिका उद्यान विभागाचे निरीक्षक शशिकांत नजन यांनी केले.
5 जुन जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त हरिभूमी प्रतिष्ठानच्या वतीने संजीवनी कॉलनीतील ओपनस्पेसमध्ये श्री नजन यांच्या हस्ते आरोग्यदायी कडुलिंबाची रोपे लावण्यात आली तसेच आधी लावलेल्या झाडांना आळे करून पाणी देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. श्री नजन पुढे म्हणाले की, वृक्षारोपणा इतकेच त्यांचे संवर्धन देखील महत्वाचे आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी वृक्षसंवर्धनासाठी पुढे आले पाहिजे. पर्यावरणाचे संतुलन पुढील पिढीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. यावेळी उद्योजक शरद ठाणगे म्हणाले की, मोकळ्या जागेत जांभुळ, चिंच आदी झाडे लावल्याने फळे व सावली असा  दुहेरी फायदा होत असल्याने नागरिकांनी अशी झाडे मोठ्या प्रमाणात लावून त्यांचे संवर्धन करावे. हरिभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय ललवाणी यावेळी सांगितले की, तीन वर्षांपूर्वी लावलेली कडूलिंब व इतर झाडे वेळोवेळी देखभाल केल्यामुळे आता दहा फुटांपेक्षा मोठी झाली आहेत. किती झाडे लावली यापेक्षा किती झाडे जगवली व वाढवली याला महत्व आहे. यावेळी उद्यान विभागाचे सुर्यभान देवघडे, उल्हास नांगरे, नितीश देशपांडे, गणेश भंडारी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here