कोरोना च्या पार्श्वभूमीवर या वर्षी ‘योग दिन’ घरीच साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 21, 2021

कोरोना च्या पार्श्वभूमीवर या वर्षी ‘योग दिन’ घरीच साजरा

 कोरोना च्या पार्श्वभूमीवर या वर्षी ‘योग दिन’ घरीच साजरा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
नेवासा ः सामाजिक अंतराचं पालन करून जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला  असुन नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेच्या तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन घरच्याघरीच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. शिक्षकांनी घालून दिलेले योगासने आणि प्राणायामचे धडे त्यांनी शाळा बंद असल्याने घरीच गिरवले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी पालकांच्या उपस्थितीत योगासन करुन त्याचे फोटो वर्गशिक्षिका श्रीमती. सुनिता कर्जुले मॅडम यांना मोबाईलवर पाठवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन सर्व शाळांमध्ये साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला भारतभर प्रतिसाद मिळाला होता. दरवर्षी सकाळी शाळा भरवून विद्यार्थ्यांना प्राणायाम आणि योगासनाचे धडे दिले जायचे. सर्व शिक्षक शिक्षिका योगासने आणि प्राणायमाचे प्रकार मुलांकडून करुन घ्यायचे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत; मात्र अनेक ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी योग दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. व्हाट्सअप ग्रुपवर माहिती व मार्गदर्शन देवून शिक्षकांनी मुलांकडून योगासने आणि प्राणायमाचे विविध प्रकार सकाळीच करवून घेतले. विद्यार्थ्याँच्या पालकांनी त्यात महत्वाची भूमिका बजावली आणि विद्यार्थ्याँच्या घरीच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. प्रवरासंगम जिल्हा परिषद प्राथमिक  केंद्रशाळेच्या मुलांसोबत शेजारच्या मुलांनीही सोशल डिस्टंन्सिंग पाळून योगासने आणि प्राणायाम प्रकारात भाग घेतला आणि आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला या वेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र चापे व इतर सहशिक्षक यांनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here