श्रीगोंद्यातील सायकल यात्रेकरुची आदर्श कामगिरी अग्नीपंखच्या सोहळ्यात मान्यवरांनी केले कौतुक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 21, 2021

श्रीगोंद्यातील सायकल यात्रेकरुची आदर्श कामगिरी अग्नीपंखच्या सोहळ्यात मान्यवरांनी केले कौतुक

 श्रीगोंद्यातील सायकल यात्रेकरुची आदर्श कामगिरी

अग्नीपंखच्या सोहळ्यात मान्यवरांनी केले कौतुक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

श्रीगोंदा ः श्रीगोंदा ते तिरुपती बालाजी हे 1 हजार 020 किमीचे अंतर श्रीगोंद्यातील आठ सायकल पटुंनी अवघ्या सात दिवसात पार करण्याची आदर्श कामगिरी केली आहे भविष्यात तरुणांनी सायकल यात्रेत सफर करुन जीवनाचा आनंद घ्यावा असे गौरवोद्गार आमदार बबनराव पाचपुते यांनी काढले आहेत.
अग्नीपंख फौंडेशनने सायकल यात्रेकरू अशोक खेंडके, नवनाथ दरेकर, संपत इधाटे, गणेश श्रीराम,  शुभम गांजुरे, नितीन ननवरे, अमोल मखरे, शुभम धर्माधिकारी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला या प्रेरणा सोहळ्यात बबनराव पाचपुते बोलत होते. नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले की अग्नीपंख फौंडेशनने प्रेरणादायी देणारे अनेक उपक्रम आणि विद्यार्थी खेळाडू निराधार अपंग व्यक्तींना मदत करण्याची चांगले काम चालविले आहे. उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर म्हणाले की जग गतीमान झाले आहे मात्र मानवी आरोग्याच्या नवीन समस्या पुढे येत आहेत आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी सायक्लिगं करणे काळाची गरज आहे. यावेळी नगराध्यक्षा शुभांगी पोटे,सुभाष शिंदे यांची भाषणे झाली अशोक खेंडके, नवनाथ दरेकर यांनी सायकल यात्रेतील अनुभव सांगितले प्रास्ताविक गोरख आळेकर यांनी केले. यावेळी उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, शहाजी खेतमाळीस, सतिश मखरे, ज्ञानदेव गांजुरे, प्रशांत गोरे, दिलीपराव काटे, मधुकर काळाणे, शुभांगी सतिश लगड, अमोल गव्हाणे उपस्थित होते सुत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले.

No comments:

Post a Comment