आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या संध्या समयी विश्व शांती, स्वास्थ, एकतासाठी ऑनलाईन संघटीत मेडिटेशन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 21, 2021

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या संध्या समयी विश्व शांती, स्वास्थ, एकतासाठी ऑनलाईन संघटीत मेडिटेशन

 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या संध्या समयी विश्व शांती, स्वास्थ, एकतासाठी ऑनलाईन संघटीत मेडिटेशन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सायंकाळी विश्व शांती, स्वास्थ, एकतासाठी ऑनलाईन संघटीत मेडिटेशनचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनीक आरोग्य सेवाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने होणार असून अध्यक्षस्थान राजयोगीनी ब्रह्माकुमारी रतनमोहिनी दादीजी चीफ ऑफ ब्रह्माकुमारीज् इंटरनॅशनल स्पिरिच्युअल युनिर्वसिटी माऊंट अबू भूषवणार आहेत अशी माहिती संघटीत मेडिटेशनच्या संयोजिका डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी (21 जून 2021) संध्या 5. 30 ते 6 (अर्धा तास) हजारो व्यक्ती एकाच दिवशी एकाच वेळी आपल्या घरी बसूनच ऑनलाईन मेडिटेशन करतील. ऊी र्डीवहर घरपज्ञरीळर या र्धेी र्ढीलश चॅनेल वर ङखतए प्रसारित होणार आहे. ही सेवा ऑनलाईन व मोफत असून या मध्ये सहभागी होणार्‍या व्यक्तींना फीडबॅक फॉर्म भरल्यानंतर ई सर्टिफिकेट प्राप्त होऊ शकेल. मेडिटेशनच्या सिद्धांता नुसार त्याची तरंगे र्(ींळलीरींळेप) जगभरातील व्यक्तींना प्रभावित करतील. व भय व दुःख युक्त मनाला रिफ्रेश, रिचार्ज करून शांती - प्रेम आनंदाची अनुभूती निर्माण करण्यासाठी मदत करतील. त्यातुन निरोगी  आरोग्य प्राप्त करण्यास सहाय्यता होईल. असे स्पिरिच्युअल सायन्स आणि सायंटिफिक सायन्स चे सिद्धांत सांगतात.  
सदर संघटीत मास मेडिटेशन रोटरी इंटरनॅशनल 3132 विभाग, इनरव्हील इंटरनॅशनल 313 विभाग, अ. भा. जैन कॉन्फरन्स तसेच ब्रम्हाकुमारीज  राजयोगा हिलर ग्रुप द्वारा आयोजित करण्यात आले आहे. असे ही त्या म्हणाल्या.
आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त विश्वशांती - स्वास्थ - एकता साठी संघटीत मेडिटेशन या कार्या मध्ये हजारो व्यक्तीनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व संस्थांनी केले आहे. जितके जास्त व्यक्ती यात सहभागी होतील तितका जास्त सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येईल. जास्तीत जास्त व्यक्तींनी सहभागी होऊन आपले स्वतः चे पुण्य कर्माचे खाते वाढवावे. या मेडिटेशन च्या तरंगामुळे स्वतःचे व परिवाराचेही संरक्षण होण्यास मदत होणार आहे. व हीच तरंगे विश्वभरात पोहचुन हवा तो सकारात्मक बदल साधता येणार आहे. असे रोटरीचे अध्यक्ष अमित बोरकर,  प्रसन्ना खाजगीवले, क्षितिज झावरे, गीता गिल्डा, सचिव पुरुषोत्तम जाधव, इनरव्हील च्या अध्यक्षा वंदना भंडारी, सुवर्णा बरमेचा कळवितात.
सदर संघटीत योग (चरीी चशवळींरींळेप) यशस्वी होण्यासाठी रोटरी इंटरनॅशनल 3132 विभाग चे अध्यक्ष रो हरीश मोटवानी, नियोजित अध्यक्ष रो ओमप्रकाश मोतिपावले , इनरव्हील इंटरनॅशनल 313 विभाग च्या अध्यक्षा अनुराधा चांडक, असो च्या संचालिका सायली खानदेशी, अ. भा. जैन कॉन्फरन्सचे सतीश (बाबू) लोढा , विमल बाफना तसेच ब्रम्हाकुमारीज  राजयोगा हिलर ग्रुप च्या डॉ सुधा कांकरिया व बी के राजराजेश्वरी दिदी हे प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here