प्रवरा नदीच्या तिरावर वसलेल्या कळसची कोरोनामुक्तीकडे वाटचाल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 7, 2021

प्रवरा नदीच्या तिरावर वसलेल्या कळसची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

 प्रवरा नदीच्या तिरावर वसलेल्या कळसची कोरोनामुक्तीकडे वाटचाल


अकोले ः
अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या तीरावर, प.पु. सुभाषपूरी महाराजांच्या पावन भूमीत, कळसेश्वर देवस्थान च्या निसर्गरम्य परिसरात अकोले तालुक्यातील कळस बु॥ गावातील युवकांचा माझ गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून  तालुक्यातील प्रथम  कोविडं केअर सेंटर उभारून तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील युवकांना प्रेरणा देणारा उपक्रम राबविला, कुठल्याही राजकीय मदतीविना जवळपास 90 रुग्णांना बरे करून झाले असून गाव कोरोना मुक्ती कडे वाटचाल केली आहे.
जिल्हा परिषद चे माजी अर्थ व बांधकाम समिती सभापती श्री. कैलासराव वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कळस गावातील तरुणांच्या पुढाकाराने निसर्गाच्या सानिध्यात प.पु. सुभाष पुरी महाराज भक्तनिवास मध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले. तालुका आरोग्य अधिकारी व  कर्मचारी तसेच डॉ. योगेश वाकचौरे, डॉ. विकास वाकचौरे, व आरोग्य सेविका सौ.प्रतिभा अंदुरे  यांचे देखरेखी खाली उपचार घेऊन त्यांना मार्गदर्शन, उपचार केल्यानंतर व  प्रत्येक रुग्णांस डिस्चार्ज दिल्यानंतर सरकारी नियमाप्रमाणे कमीत कमी चौदा दिवस होम कोरनटाईन होण्यास मार्गदर्शन केले. व त्याचा ही आढावा घेऊन गावात कोणत्याही प्रकारे पेशन्ट वाढणार नाहीत याची खबरदारी घेतली.
आजपर्यंत 17 रुग्णाचा स्कोर जास्त असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना सूचित करून रुग्णांना बाहेर पाठवण्यात आले. तसेच आज पर्यंत बरे झालेल्या कोविड रुग्णामध्ये गावातील व पंचक्रोशीतील असे मिळून कमीत कमी पन्नास लाख रु वाचल्याचे समाधान कोविड केअर कमिटीस झाले.
छत्रपती युवा प्रतिष्ठानचे श्री. सागर वाकचौरे, भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष श्री. नामदेव निसाळ, युवा कार्यकर्ते श्री. गोरख वाकचौरे, विज वितरण कर्मचारी संघटनेचे श्रीराम वाकचौरे, गोकुळ वाघ, श्री. गोरख गोरे, श्री. दिनेश चव्हाण, सुरेश गोसावी सर, प्रवीण भुसारी, संजय सोनवणे, सोमनाथ कवडे, महेश पाडेकर, पुरुषोत्तम सरमाडे, कृणाल वाकचौरे, मधुकर नवले यांनी विशेष लक्ष देऊन हे कोव्हिडं सेंटर उभारले. याकामी गावचे सरपंच राजेंद्र गवांदे, उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे, दत्तात्रय रामनाथ वाकचौरे, पोलीस पाटील श्री. गोपीनाथ ढगे, ग्रामसेवक कचरू भोर तलाठी प्रमोद शिंदे, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी लक्ष देत सहकार्य केले.
एक हात मदतीचा, आदर्श गावाचा, आदर्श उपक्रम व आपलं गाव, आपली जबाबदारी या माध्यमातून युवकांनी कोविड केअर सेंटर, कळस बु. साठी मदत देण्याचे आवाहन केले त्याला गावातील व पंचक्रोशीतील, नागरिकांनी तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे  युवावर्गांने मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य केले. कैलासभाऊ वाकचौरे, मे. चौधरी फर्निचर मॉल, सुगाव यांनी च्या गाद्या दिल्या, बायफ पुणे सेवाभावी संस्थेकडून 5 ऑक्सिजन टँक व ऑक्सिजन मीटर, शिक्षक समन्वय समिती अकोले, काँग्रेस महिला आघाडीच्या उत्कर्षाताई रुपवते, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर मुबारक ताई शेख (मुंबई), डॉ. अमोल भाऊसाहेब वाकचौरे, अगस्ती महाविद्यालय अकोले सन 1999-2000 चे विद्यार्थी यांचे तर्फे औषधे व गोळ्या देण्यात आल्या. वैभव भाऊ पिचड यांचे वाढदिवसानिमित्त श्री. सुशील शेवाळे यांचे तर्फे पाणी बॉक्स, अगस्ती सहकारी साखर कारखान्यातर्फे 35 ली. सनेटाईझर, यशस्वी फाऊंडेशन संगमनेर तर्फे सनेटाईझर व मास्क, श्री.दर्शन बाबाजी वाकचौरे यांचे तर्फे पाचशे मास्क, कळसेश्वर विद्यालय कळस च्या सन 1985,1997,2000, 2003 च्या  तर्फे आर्थिक मदत, 1995 बॅच तर्फे 50 पाणीबॉक्स व सफाई कामगार यांचे विमा खर्च, सन 2004 च्या वाटर फिल्टर, प्राचार्य डॉ.श्री.शिवाजीराव कारभारी ढगे सर, सावित्रीबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव पिसा, ता.श्रीगोंदा, भीमाशंकर सह. साखर कारखाना, आंबेगाव चे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, इंजिनियर महेश रामनाथ वाकचौरे, श्री. छत्रपती युवा प्रतिष्ठाण, कळस बु॥, कै. सुरेश शंकर शिर्के व कै. लहानबाई सुरेश शिर्के  यांच्या स्मरणार्थ श्री. सोमेश्वर सुखदेव शिर्के, मे. धीरज ऍग्रो सर्व्हिसेस कळस बु॥, श्री. स्वामी समर्थ केंद्र, सांगवी, श्री. नामदेव भागुजी वाकचौरे, पत्रकार श्री.अमोल मारुती शिर्के, श्री. डॉ. सुरज हेमंतकुमार ढगे, श्री. किसन नवसाजी वाकचौरे, सौ.संगीता रामनाथ चौधरी, सौ.लता गोविंद चासकर, श्री विठ्ठल पुंजा वाकचौरे, बापूसाहेब वाकचौरे यांचे सह गावातील व्यावसायिक, शिक्षक, नोकर, नागरिक व युवा वर्गाने भरघोस प्रतिसाद दिला.
तसेच कळस बु येथे 251 नागरिकांचे कोविशील्ड लसीचे लसीकरण करण्यात आले. तीन वेळा कोरोना टेस्ट करण्यात आल्या. त्यावेळी कळस कोविड सेंटरच्या स्वयंसेवकांनी सुसज्य असे नियोजन केले होते.
कोविड सेंटर चे खास वैशिष्ट्य म्हणजे, कळस  कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना रोज सकाळी घरगुती पद्धतीने स्वादिष्ट नाष्टा दिला जातो. सोमवार गोडशिरा, मंगळवार डोसे, दूध खीर, बुधवार पावभाजी, गुरुवार भगरीचे धिरडे, शुक्रवार उत्तपा, शनिवार इडली सांबर, रविवार  पावभाजी दोन वेळा चहा बिस्कीट, सकाळी व रात्री गरम पाण्याची वाफ दिली जाते. दिवस भरातून तीन वेळा तज्ञ डॉक्टरांचा चेकप राउड नियमित होतात, सर्व प्रकारची गोळ्या औषध मोफत दिली जातात. त्याचप्रमाणे सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम चालू असतात. त्याच प्रमाणे कोविड केअर सेंटर चा संपूर्ण परिसर नियमित स्वच्छ व सनेटाईज केला जातो.
आपले गाव आपली जबाबदारी ह्या संकल्पनेतून युवकांनी निर्माण केलेल्या ह्या उपक्रमास गावातील व पंचक्रोशीतील सुज्ञ व व्यावसायिक युवकांनी खूप छान उपक्रम राबवून गावातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले अनेक गरीब कुटुंबाना फायदा झाला हा युवकांचा स्तुत्य उपक्रम राबविला त्यांच्या याकार्याला सलाम असे मत येथे उपचार घेऊन बरे झालेले माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here