केंद्रातील भाजप सरकार मुळेच देशाची दुर्दशा - जालिंदर चोभे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 7, 2021

केंद्रातील भाजप सरकार मुळेच देशाची दुर्दशा - जालिंदर चोभे

 केंद्रातील भाजप सरकार मुळेच देशाची दुर्दशा - जालिंदर चोभे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
सर्वसामान्यांच्या प्रश्नावर का बोलत नाही?

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भांडवलशाही आणि जातीयवादी केंद्रातील भाजप सरकार मुळेच देशाची दुर्दशा झालेली आहे. शेतकरी, युवकांचा रोजगार व कोरोनाच्या गंभीर परिस्थितीने देशात हाहाकार माजला असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या प्रश्नांवर का बोलत नसल्याचा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते जालिंदर चोभे मास्तर यांनी उपस्थित केला आहे.
मोदी प्रणित भाजप सरकार सत्तास्थानी येण्यास अण्णा हजारे कारणीभूत आहे. देशात काँग्रेस सरकार सत्तेवर असताना अण्णांनी त्यांच्या विरोधात अनेक आंदोलन करून सरकार भ्रष्ट असल्याची प्रतिमा रंगवली. मात्र सध्या देशात भ्रष्टाचार व अनागोंदी माजलेली असताना अण्णा बोलण्यास तयार नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गांधीवादी नसून ते संघसेवक असल्याचा आरोप देखील चोभे यांनी केला आहे. भ्रष्टाचार विरोधात सतत आंदोलन करणारे अण्णा हजारे शेतकर्यांच्या मागण्यांसाठी गोळीबार होईपर्यंत, कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य जनता अनागोंदीने त्रस्त असताना या विषयावर बोलण्यासाठी तयार नाही.
मोदी सरकारने शेतकरी व  कामगार विरोधी कुठलीही चर्चा न करता अवाजवी बहुमताने बेकायदेशीर कायदे पास करून अर्थव्यवस्था, शेतकरी व कामगारांचे वाटोळे केले. देशात शेतकरी आंदोलनाची गिनिज बुकात नोंद होण्याची वेळ आली आहे. देशातील जनता बेकारी आणि कोरोना महामारीमुळे किडे- मुंग्यासारखी मरत आहेत. महिलांवर वाढते अत्याचार, लहान मुलांच्या शिक्षणाचे केलेले वाटोळे, देशाने आजवर निर्माण केलेल्या संपत्तीचे संस्थाने मोदी सरकार कवडीमोल भावाने भांडवलदारांच्या ताब्यात देत आहेत. त्यामुळे समाजातील सर्वच घटक हवालदिल झालेले आहे. अण्णांनी मोदीप्रणीत भाजप सरकार विरोधात भूमिका घेतली नाही. भाजप सरकार बेलगामपणे जनविरोधी निर्णय घेत आहे. तर मोदी सरकार ईव्हीएम मशीनद्वारे पुन्हा सत्ता मिळवत असल्याचा आरोप प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment