सुरेगाव येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजदंड स्वराज्य गुढी उभारून शिवरायांना अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 7, 2021

सुरेगाव येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजदंड स्वराज्य गुढी उभारून शिवरायांना अभिवादन

 सुरेगाव येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजदंड स्वराज्य गुढी उभारून शिवरायांना अभिवादन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा तालुक्यातील सुरेगाव(गंगा)येथे ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजदंड स्वराज्य गुढी उभारून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाद्वारे अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच कुमारी पदमाताई शिंदे यांच्या हस्ते राजदंड स्वराज्य गुढीची तर उपसरपंच सुनील शिंदे  यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.यावेळी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय,हर हर महादेव अशी शिवगर्जना घोषणेद्वारे करण्यात आली.युवा ग्रामपंचायत सदस्य राहुल शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना ग्रामपंचायतचे मार्गदर्शक अंकुश शिंदे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले आज त्यांच्या शिवराज्याभिषेक दिनी आम्हा सर्वांना गुढी द्वारे ध्वजपूजन करण्याचा योग आला याचे खरे समाधान मिळाले असल्याचे स्पष्ट करून त्यांनी ज्यांनी स्वराज्य निर्माण केले अशा छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असून शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असल्याचे सांगितले.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समितीचे सदस्य रविंद्र शेरकर,ग्रामपंचायतचे मार्गदर्शक अंकुश शिंदे,सरपंच कु.पदमाताई शिंदे, उपसरपंच सुनील शिंदे,ग्रामपंचायत सदस्या सौ.उषाताई शिंदे,युवा सदस्य राहुल शिंदे,गणेश शिंदे,सौ.लक्ष्मीबाई शिंदे,महेश शिंदे, अमोल शिंदे,शरद शिंदे,सौ.सरस्वती शिंदे,सौ.लक्ष्मीबाई बर्डे, ग्रामसेवक आर. वाय.मुसमाडे,ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब शेळके अंगणवाडी सेविका लता शिंदे,आशा शिंदे,पुष्पा शिंदे,हिराबाई शेळके,अलका जाधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here