बहिरवाडी गाव झाले कोरोनामुक्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 15, 2021

बहिरवाडी गाव झाले कोरोनामुक्त

 बहिरवाडी गाव झाले कोरोनामुक्त


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  नगर तालुक्यातील बहिरवाडी हे गाव कोरोनामुक्त झाले आहे. बहिरवाडी या गावात मार्च महिन्यापासून आज पर्यंत 65 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले होते. त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
बहिरवाडी गावाने गाव कोरोना मुक्त होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. सरपंच अंजना येवले, उपसरपंच मधुकर पाटोळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, भाजप तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे, ग्रामसेवक साबळे, तलाठी मुंडे, संजय येवले यांच्या मार्गदर्शनाखाली गावात जंतनाशक औषधाची फवारणी केली होती तसेच मास्क, सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. गावामध्ये विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली होती तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृती करून ग्रामस्थांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले होते.
बहिरवाडी गावात सुरुवातीपासून तहसिलदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंडळाधिकारी वृषाली करोसिया यांच्या सहकार्याने महसूल विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गटविकास अधिकारी सचिन घाडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कर्डिले यांच्यासह कोरोना ग्रामस्तरीय समितीने घेतलेल्या प्रयत्नांमुळे गाव कोरोनामुक्त झाल्याची माहिती सरपंच अंजना येवले यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here