कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या डॉ. अविनाश घोडेकरांच्या कुटुंबाला आर्थिक मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 15, 2021

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या डॉ. अविनाश घोडेकरांच्या कुटुंबाला आर्थिक मदत

 कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या डॉ. अविनाश घोडेकरांच्या कुटुंबाला आर्थिक मदत

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या हस्ते घोडेकर कुटुंबाला मदत सुपुर्द


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची पारनेर या ठिकाणी बैठक पार पडली या बैठकी मध्ये विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच सर्वानुमते काही निर्णय घेण्यात आले, यामध्ये नुकत्याच कोरोना मुळे मृत्यूमुखी पडलेले संघटनेचे सभासद डॉ. अविनाश घोडेकर यांच्या कुटुंबीयांना काही आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला,त्यासाठी संघटनेच्या सर्व सभासदांनी मदत निधी जमा केला आणि आज दिनांक14 जुन रोजी हा भरीव आर्थिक मदत निधी आपल्या तालुक्याचे तहसीलदार सौ ज्योती देवरे मॅडम यांच्या हस्ते घोडेकर कुटुंबाला सुपुर्द करण्यात आला .तसेच संघटनेचे जेष्ट सदस्य  ओंकार हॉस्पिटल चे  डॉ किरण रोहकले यांच्या वतीने या कुटुंबाला नियमित आरोग्यविमा देण्यात आला.
तसेच तहसीलदार मॅडम यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले की डॉ घोडेकर यांचा मृत्यू हा कॉविड मध्ये रुग्णाची सेवा करत असताना झाला होता,कारण पारनेर तालुक्यातील सर्व खाजगी डॉ नी तहसीलदार मॅडम च्या आदेशानुसार सर्व शासकीय रुग्णालयात विनामोबदला सेवा देण्याचे काम केले होते त्यामुळे सेवा देत असताना कुणाचा मृत्यू झाला तर शासनाकडून ही काही मदत मिळावी,अशी आग्रही मागणी संघटनेच्या वतीने तहसीलदार मॅडम यांना करण्यात आली.
सदर प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष डॉ अजित लंके,उपाध्यक्ष डॉ गणेश सांगळे,सचिव डॉ नितीन रांधवान,खजिनदार डॉ संदीप औटी तसेच अन्य सभासद डॉ भाऊसाहेब खिलारी, डॉ बाळासाहेब पठारे,डॉ श्रीकांत पठारे,डॉ  संतोष आढाव,डॉ पांडुरंग थोरात,डॉ महेश ठुबे,डॉ सोबले, डॉ आहेर,डॉ सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
अडचणीच्या काळात संघटना या परिवाच्या मागे उभी राहिली म्हणून तहसीलदार ज्योती देवरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले तसेच शासनाकडून शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासन ही यावेळी दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here