लोकप्रतिनिधी हे जि. प.च्या माध्यमातून मंजूर होणार्‍या कामाचे श्रेय घेत आहेत : दाते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

लोकप्रतिनिधी हे जि. प.च्या माध्यमातून मंजूर होणार्‍या कामाचे श्रेय घेत आहेत : दाते

 लोकप्रतिनिधी हे जि. प.च्या माध्यमातून मंजूर होणार्‍या कामाचे श्रेय घेत आहेत : दाते

सभापती दाते, माजी सभापती तांबे व शिवसेना नेते भोसले यांनी आमदार लंकेंना सुनावले.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः जिल्हा परिषदेच्या माध्यमातून क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यातील श्री. देवी अंबिका ट्रस्ट, देवीभोयरे श्री. भैरवनाथ देवस्थान वाळवणे, श्रीक्षेत्र खंडेश्वर देवस्थान अपधूप, श्री. काळ भैरवनाथ देवस्थान जातेगाव, श्री गोरेश्वर मंदिर देवस्थान गोरेगाव, शेख बुद्दीन चिस्ती रहे दर्गाह दरोडी, शांतानंद महाराज मंदिर रायतळे, या सात तीर्थक्षेत्रांसाठी प्रत्येकी तीन हायमॅक्स एकूण रक्कम 1 कोटी 05 लाख रुपये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून मंजूर झाली आहे.  हा निधी आमदार निलेश लंके यांच्या  पाठपुराव्याने मिळाला असल्याच्या बातम्या समाज माध्यमांमध्ये येत आहेत यावर  पारनेर तालुका शिवसेनेने आक्षेप घेतला असून आमदार निलेश लंके वारंवार आमच्या  मंजूर कामाचे श्रेय घेत आहेत हे त्यांनी बंद करावे असे म्हणत शिवसेना नेत्यांनी लंके यांच्यावर चांगलीच तोफ डागली आहे. यावर बोलताना  अहमदनगर जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर  म्हणाले की तालुक्यातील लोकप्रतिनिधी हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर होणार्‍या कामाचे श्रेय घेत आहेत. हे लाजीरवाणे असून ते जनतेची दिशाभूल करत आहे. वारंवार आमच्या कामाचे श्रेय घेऊन त्यांना नेमका काय साध्य करायचे आहे.  मुळतः लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर होणार्‍या कामांचे श्रेय घेणे कितपत योग्य आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवसेना नेते बाबासाहेब तांबे म्हणाले की आमदार निलेश लंके यांचे माझ्या गोरेगाव वर एवढे प्रेम आहे का त्यांनी आमच्या देवस्थानसाठी तीन हायमॅक्स मंजूर करून द्यावेत.  मुळतः जिल्हा परिषदेला दिलेला प्रस्ताव हा गोरेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिला आहे. आमदार निलेश लंके यांचे साधे पत्र सुद्धा ग्रामपंचायतला प्राप्त नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामाचे श्रेय त्यांनी घेण्याचा प्रयत्न करू नये.  आमदार लंके यांनी काम मंजुरीसाठी पाठवलेले शिफारस पत्र दाखवावे. असे चॅलेंजच तांबे यांनी केली आहे.
शिवसेनेचे अहमदनगर दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष रामदास भोसले यांनी आमदार निलेश लंके नैतिकता सोडून राजकारण समाजकारण करत आहेत. क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या कामाचे श्रेय घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सात देवस्थानसाठी मंजूर झालेले 1 कोटी 05 लाख रुपये किंमतीचे हायमॅक्स जिल्हा परिषदेचे  बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाले असून ते मंजूर करण्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे. आमदार निलेश लंके यांनी यामध्ये श्रेय घेण्याचा प्रयत्न करून  समाजाची दिशाभूल करू नये.
अशाप्रकारे पारनेर तालुक्यातील शिवसेना नेत्यांनी आमदार निलेश लंके जिल्हा परिषदेच्या मंजूर असलेल्या कामांवर करत असलेला दावा  खोटा असल्याचे सांगत  आपल्या तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment