नारायण गव्हाण येथील माजी सरपंच राजाराम शेळके यांची हत्या! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 11, 2021

नारायण गव्हाण येथील माजी सरपंच राजाराम शेळके यांची हत्या!

 नारायण गव्हाण येथील माजी सरपंच राजाराम शेळके यांची हत्या!

पोलीस घटनास्थळी दाखल तपास सुरू.नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी- 

पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील माजी सरपंच राजाराम शेळके यांची निघृण हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शेळके हे त्यांच्या शेतात काम करत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी शेळके हे एकटेच होते. दुपारी एकच्या सुमारास त्यांच्यावर मारेकर्‍यांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आले. त्यात त्यांच्या मानेला गंभीर जखम झाली. त्यांना तातडीने शिरुर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

राजाराम शेळके हे दहा वर्षापूर्वी नारायाणगव्हाणचे माजी सरपंच प्रकाश कांडेकर यांच्या हत्याकांडातील आरोपी होते. त्यांच्यासह कांडेकर खून प्रकरणात आणखी काही आरोपी होते. राजाराम शेळके आणि त्यांच्या मुलाला या गुन्ह्यात शिक्षा लागली होती. कोरोना संसर्ग वाढल्याने त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. पॅरोलची रजा उपभोगत असताना त्यांनी गावातील शेतात काम चालू केले होते आणि हे काम चालू असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेज व इतर तपास सुरू असून पोलिसांनी हल्लेखोरांना शोधण्याच्या दिशेने चक्रे फिरवली आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here