दाळमंडई येथे भूमी एजन्सीज ग्राहक सेवेत दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 11, 2021

दाळमंडई येथे भूमी एजन्सीज ग्राहक सेवेत दाखल

 दाळमंडई येथे भूमी एजन्सीज ग्राहक सेवेत दाखल


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः दर्जेदार सुकामेवा, मसाले, घाण्याचे अस्सल तेल, गायीचे शुध्द तूप तसेच विविध सेंद्रीय उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी नगरमध्ये भूमी एजन्सीज हे दालन सुरु झालं आहे. दाळमंडईतील आनंद कॉम्प्लेक्स येथे या दालनाचा शुभारंभ आशा मुनोत व विजय मुनोत यांच्या शुभहस्ते झाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून भूमी एजन्सीजचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विराज मुनोत, श्रीकांत मुनोत, मनोज मुनोत, सुनिता मुनोत, सुवर्णा मुनोत, रिध्दी मुनोत उपस्थित होते.
गौरव मुनोत यांनी सांगितले की, आजकाल प्रत्येक जण आरोग्याबाबत सजग झालेला आहे. विशेषत: आपण जे अन्नपदार्थ सेवन करतो ते अतिशय उच्च गुणवत्तेचे असतील याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. अशा सर्व ग्राहकांना अतिशय रास्त दरात उत्तम गुणवत्तेचे सर्व प्रकारचे ड्रायफ्रूटस, लाकडी घाण्यातून तयार केलेले विविध प्रकारचे तेल, शुध्द देशी गायीचे तूप तसेच सेंद्रीय उत्पादने भूमी एजन्सीजमध्ये उपलब्ध असणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ग्राहकांना खरेदी करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय घरपोच सेवा दिली जाणार आहे. सर्व मसाले व इतर उत्पादने ठोक व किरकोळ विक्रीकरता उपलब्ध असल्याचे मुनोत यांनी सांगितले. श्रीकांत मुनोत यांनी आभार मानले. अधिक माहिती व खरेदीसाठी संपर्क 7620795097

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here