राहुल पितळे यांच्या स्मरणार्थ क्रेडाईतर्फे आरोग्य आधारला 13 ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटरची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 7, 2021

राहुल पितळे यांच्या स्मरणार्थ क्रेडाईतर्फे आरोग्य आधारला 13 ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटरची भेट

 राहुल पितळे यांच्या स्मरणार्थ क्रेडाईतर्फे आरोग्य आधारला 13 ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटरची भेट


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः क्रेडाई अहमदनगरचे माजी सेके्रटरी तसेच राज्य क्रेडाईचे पदाधिकारी राहुल पितळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ के्रडाई अहमदनगरने कोविड रूग्णांसाठी 13 ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटर मशिन दिल्या आहेत. भारतीय जैन संघटना, आरोग्य आधार या संस्थेकडे या मशिन सुपुर्द करण्यात आल्या असून या मशिनचा रूग्णांना मोफत लाभ दिला जाणार आहे.
यावेळी के्रडाई अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा, सेक्रेटरी अमित वाघमारे, खजिनदार प्रसाद आंधळे, संजय गुगळे, बीजेएसचे आदेश चंगेडिया, आशिष पोखरणा, सागर गांधी, गौरव पितळे आदी उपस्थित होते. अमित मुथा म्हणाले की, क्रेडाईचे अतिशय हसतमुख पदाधिकारी आणि युवा उद्योजक राहुल पितळे यांच्या रुपाने सर्वांनी गमवला. त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात तसेच सध्याच्या कोविड महामारीच्या काळात रूग्णांना लवकरात लवकर उपचार मिळावे यासाठी ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटर देण्याची संकल्पना पुढे आली. सर्व पदाधिकारी, सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला व आज या मशिन आरोग्य आधारकडे हस्तांतरीत करत आहोत.

No comments:

Post a Comment