सुश्री फाउंडेशन आणि वंचित विकासतर्फे वि. ल. शिंत्रे स्मृती कथा स्पर्धा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

सुश्री फाउंडेशन आणि वंचित विकासतर्फे वि. ल. शिंत्रे स्मृती कथा स्पर्धा

 सुश्री फाउंडेशन आणि वंचित विकासतर्फे वि. ल. शिंत्रे स्मृती कथा स्पर्धा

पुणे ः वंचित विकास संस्थेतर्फे  प्रकाशित करण्यात येणार्‍या निर्मळ रानवारा या लहान मुलांच्या मासिकामार्फत बालकथा स्पर्धा सुश्री फाउंडेशन तर्फे वि. ल. शिंत्रे स्मृती कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 6 ते 12 वयोगटासाठी प्रकाशित होणार्‍या या अंकासाठी 400 शब्दमर्यादेत स्वलिखित कथा पाठवावी.  कथा अनुवादित  नसावी. कथेला विषयाचे बंधन नाही. ती लहान मुलांच्या भावविश्वाला धरून असावी. कृपया  झेरॉक्स पाठवू नये. कथा हस्तलिखित  स्वरूपात आणि कागदाच्या एका बाजूला लिहिलेली असावी. कथा पाठवण्याची  अंतिम तारीख 30 जून 2021.
स्पर्धेसाठी आलेल्या कथांपैकी बक्षीस पात्र आणि निवडक कथा सप्टेंबर 2021  मध्ये प्रसिद्ध होणार्‍या कथा विशेषांकात प्रकाशित केल्या जातील.
संपर्क - 405/9, नारायण पेठ,  मोदी गणपती मागे, पुणे 30. फोन- (020) 24454658.

No comments:

Post a Comment