ज्ञानेश्वर महाराज मंदिरावरील माहितीपटामुळे माऊलींच्या कार्याचा जगभर प्रसार ः देशमुख महाराज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

ज्ञानेश्वर महाराज मंदिरावरील माहितीपटामुळे माऊलींच्या कार्याचा जगभर प्रसार ः देशमुख महाराज

 ज्ञानेश्वर महाराज मंदिरावरील माहितीपटामुळे माऊलींच्या कार्याचा जगभर प्रसार ः देशमुख महाराज


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या  संत ज्ञानेश्वर मंदिरावरील माहितीपटामुळे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कर्मभूमी चा व जगाला सोप्या भाषेत गीतेचे तत्वज्ञान सांगण्याच्या मोठ्या कार्याचा सर्व जगभर प्रचार व प्रसार होणार असल्याचे प्रतिपादन विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख यांनी केले
श्री क्षेत्र नेवासे येथील ज्ञानेश्वरी रचना स्थानावरील दृक्श्राव्य स्वरूपातील माहितीपटाचं प्रकाशन प्रसिद्ध पैस खांबा समोर रविवारी (ता.6) शिवाजी महाराज देशमुख यांनी संगणकाचे बटन दाबून  करण्यात आले.या माहितीपटाचे संहिता लेखन, निवेदन आणि संपादन राहुल कुलकर्णी यांनी केले आहे. श्री क्षेत्र नेवासे येथील  ज्ञानेश्वरांनी केलेला कर्मयोग, या रचना स्थानाचे ऐतिहासिक महत्त्व, पैस खांबाचे महत्त्व आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचा रचनेचा इतिहास या माहितीपटातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
राहुल कुलकर्णी यांनी गोदावरी काठावरील अनेक तीर्थ स्थळांचा अभ्यासपूर्ण माहितीपट तयार केलेले आहेत गोदा संस्कृती व प्रवरा संस्कृतीवर या माहितीपटात द्वारे मोठ्या प्रकाश पडणार आहे संत ज्ञानेश्वरांचे कर्मभूमी असलेल्या या ठिकाणाचा या माहितीपटात द्वारे यूट्यूब चैनल वर वर सर्व जगभर प्रसार होणार असल्याबद्दल संस्थांतर्फे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते हस्ते माहितीपट बनवणार्‍या तिघांचाही सत्कार करण्यात करण्यात आला.यासाठी राजीव  जाधव, दीपक बिरुटे आणि रामचंद्र बिरूटे यांनी छायाचित्रिकरण केले आहे.
रविवारी एकादशीचे औचित्यसाधून श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते या माहितीपटाचे प्रकाशन झाले. यावेळी जेष्ठ पत्रकार गुरूप्रसाद देशपांडे, नीतीन कुलकर्णी, राजेश जगताप, आशिष कावरे, शिवाजी होण, भाऊराव सोमवंशी, राहुल कुलकर्णी, राजीव जाधव, दीपक बिरूटे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment