अहमदनगर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वेबसाईटचे उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

अहमदनगर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वेबसाईटचे उद्घाटन

 अहमदनगर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वेबसाईटचे उद्घाटन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्हा पतसंस्थाच्या सहकारी फेडरेशनच्या ुुु.रहाशवपरसरीषशवशीरींळेप.लेा  या नव्या वेबसाईटचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन सबाजीराव गायकवाड यांच्या हस्ते फेडरेशनच्या कार्यालयात करण्यात आले.
वेबसाईट बद्दल माहिती देताना चेअरमन सबाजीराव गायकवाड म्हणाले, नगर जिल्हा पतसंस्था सहकारी फेडरेशनच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षापासून जिल्ह्यातील पतसंस्थांना सहकार्य करत प्रश्न व समस्या सोडवल्या जात आहे. आता आधुनिक काळा बरोबर चालत डीजीटल तंत्रज्ञानात पदार्पण करत जिल्हा फेडरेशनची नवी वेबसाईट सुरु केली आहे. या वेबसाईट मुळे जिल्हयातील नागरी, ग्रामीण बिगर शेती व पगारदार पतसंस्थांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी 24 तास व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
अहमदनगर जिल्हा फेडरेशन ने गेल्या 20 वर्षापासून जिल्यातील पतसंस्थांचे थकीत कर्ज वसुलीचे काम करीत आहे. फेडरेशनने मोठया प्रमाणावर कलम 101 चे दाखले दिलेले असून कलम 156 अन्वये प्राप्त वसुली अधिकारी मार्फत चांगली वसुली करून दिली आहे. त्यामुळे फेडरेशनचे कामकाज दिवसेंदिवस वाढत असून संस्थेची माहिती ऑनलाईन मध्यामतून सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी या वेबसाईटची निर्मिती केली असल्याची माहिती संचालक प्रशांत गायकवाड यांनी दिली,
वेबसाईटच्या अनावरण प्रसंगी फेडरेशनचे सचिव श्रीए.डी.जाधव, व्यवस्थापक ए. पी. वाघमारे, कार्यालयीन अधीक्षक एन.डी. गाडेकर, विशेष वसुली अधिकारी एम. ए. शेख, बी. पी पवार, जे.डी. काळे, कर्मचारी एस.सी रासकर, एस.एस.मस्के,गी.ए.खेडकर, गौरव पवार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment