सामाजिक कार्यकर्त्याचं ब्लॅकमेलिंग; गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 22, 2021

सामाजिक कार्यकर्त्याचं ब्लॅकमेलिंग; गुन्हा दाखल

 सामाजिक कार्यकर्त्याचं ब्लॅकमेलिंग; गुन्हा दाखल

पारनेर तहसीलदार ज्योती देवरेंची खंडणीची फिर्याद.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः माहितीच्या अधिकारातून माहिती मागून अधिकार्‍याच्या विरोधात तक्रार देणे, त्यांच्याशी संपर्क करून त्यांना तक्रार मागे घेण्यासाठी खंडणी मागणारे सामाजिक कार्यकर्त्यांची एक नवी जमात नगर जिल्ह्यातून उदयास आली आहे. पारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी अन्याय निर्मूलन समितीचा अध्यक्ष म्हणून मिरविणार्‍या अरुण रोडे (रा.धोत्रे बु. ता. पारनेर) या सामाजिक कार्यकर्त्याचा बुरखा काल त्याला रंगेहात पकडून फाडला आहे. अन्याय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच नाव धारण करून खंडणी मागणार्‍या अनेक सामाजिक संस्था आज जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत. आज एक रोडे रंगेहात पकडला असे अनेक रोडे आज जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात घिरट्या घालत आहेत. पारनेर तहसीलदारांनी केलेले धाडस आणखी कोण दाखवणार हा खरा प्रश्न आहे.
पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात माहिती अधिकार अर्ज व वरिष्ठांकडे केलेले अर्ज मागे घेण्यासाठी तडजोडीअंती 30 हजार रुपयाची लाच अन्याय निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडेने मागितली होती. काल दुपारी 3 वाजता तहसीलदार देवरे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांचा बुरखा फाडला. यासंबंधीची फिर्याद तहसिलदार ज्योती रामदास देवरे वय-44 वर्षे धंदा नोकरी, तहसिलदार पारनेर, ता पारनेर, जिल्हा अहमदनगर यांनी दिली असून अरुण रोडे  याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
14 जून रोजी पारनेर तहसीलदार कार्यालयात अरुण रोडे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना भेटून मी तुमच्याविरुद्ध वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारी मागे घेतो मला 50 हजार रुपये द्या अशी मागणी केली. तहसीलदार देवरे यांनी माझ्याविरुद्ध बातम्या का छापता असे विचारले असता रोडे यांनी माझा दररोजच्या खर्च 2 हजार रुपये आहे. वेगवेगळ्या अधिकार्‍यांचे तक्रार अर्ज लिहिणे झेरॉक्स काढणे कार्यकर्ते सांभाळणे या साठी पैसे लागतात असे सांगितले. दोन-तीन वेळा रोडे यांनी तहसीलदार कार्यालयात येवून पैशाची मागणी केल्यावर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी काल ट्रॅप लावून 30 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले तहसीलदार ज्योती देवरे यांच्या फिर्यादीवरून पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे व सत्यम शिंदे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here