आज युसूफ खान बनलो; उद्या शेतकरी मजूरही बनेल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 22, 2021

आज युसूफ खान बनलो; उद्या शेतकरी मजूरही बनेल.

 आज युसूफ खान बनलो; उद्या शेतकरी मजूरही बनेल.

पालकमंत्री बच्चू कडूंचा
वेषांतराचा नवा फंडा; प्रशासनात उडाली खळबळ.


अकोला -
मंत्रीपद घेतलं म्हणजे बटन दाबल्यासारखं सर्वकाही व्यवस्थित होतं, असं नाही. आंदोलन हे तुमच्या मागणीला जिवंतपणा आणण्याचं काम असतं, मी वेशांतर करुन गेलो. काही प्रश्न हे बैठका घेऊन मिटत नाहीत. प्रशासनावर अंकुश ठेवायचा असेल, सर्वसामान्य माणसांसाठी प्रशासन लोकाभिमूख करायचं असेल तर हा अंकुश ठेवणं गरजेचं आहे. आज बच्चू कडू युसूफ खान म्हणून आला, उद्या एखादा शेतकरी, मजूर बनूनही येऊ शकतो, प्रशासनावर अंकुश ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचं अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं.
मुंबई आपल्या अनोख्या कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी काल चक्क वेशांतर करुन अकोला शहर व पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन कारभाराचा धांडोळा घेतला. त्यामुळे, त्यांची ही वेगळी स्टाईल चर्चेचा आणि टीकेचाही विषय बनली आहे. यावर स्पष्टीकरण देताना प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी हा प्रयत्न केल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं. बच्चू कडूंनी सोमवारी काही स्वस्त धान्य दुकानांनाही भेटी देऊन धान्य वितरणात काळा बाजार होतो की कसे, याबाबत माहिती घेतली. युसुफखा पठाण हे बनावट नाव धारण करून महानगरपालिकेचा फेरफटका मारला. विविध विभागांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा त्यांच्या कक्षात नसल्याने त्यांच्या स्विय सहायकाशी त्यांनी संवाद साधला. विशेष म्हणजे एकही मनपा कर्मचारी बच्चू कडू यांना ओळखू शकला नाही. मात्र, ते निघून गेल्यानंतर पालकमंत्री वेश पालटून आले होते, हे समजताच मनपा परिसरात मोठी खळबह उडाली होती. यासंदर्भात बोलताना कडू यांनी यापुढेही बच्चू कडून शेतकरी किंवा मजूर बनून येऊ शकतो, असे म्हटले आहे.

No comments:

Post a Comment