गुगल मॅपवर नवीन कोर्ट ते बुर्‍हाणनगर रस्ता चौकाचे नाव औरंगजेब रोड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 11, 2021

गुगल मॅपवर नवीन कोर्ट ते बुर्‍हाणनगर रस्ता चौकाचे नाव औरंगजेब रोड

 गुगल मॅपवर नवीन कोर्ट ते बुर्‍हाणनगर रस्ता चौकाचे नाव औरंगजेब रोड

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने केला तीव्र निषेध, संबंधितांवर कडक कारवाईची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील नवीन जिल्हा न्यायालय ते बुर्हाणनगर रोड चौक ते भुईकोट किल्ला या रस्त्याचे अधिकृत नाव पाँटीजर रोड असताना गुगल मॅपवर या रस्त्याचे नाव औरंगजेब रोड असे दिसून येत असल्याने शहरात वादाला तोंड फुटले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत सदर रस्त्याचे नाव बदलण्याचा खोडसाळपणा करणार्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. याबाबत जिल्हा प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी देवीदास मुदगल, महेश निकम, भूषण झारखंडे, गणेश लाटणे, दिनेश जोशी, तानाजी देवकर, दीपक घोडेकर, संतोष पठाडे, अभिजीत नलगे आदी उपस्थित होते. निवदेनात म्हटले आहे की, गुगल मॅपमध्ये नवीन जिल्हा न्यायालय ते बुर्हाणनगर रोड चौक रस्त्याचे नाव औरंगजेब रोड असे दाखविण्यात येत आहे. वास्तविक या रस्त्याचे मूळ नाव पाँटीजर रोड असे आहे. क्रूरकर्मा औरंगजेबाचे असे नाव देवून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रकार झाला आहे. सदर रस्त्याचे नाव बदलण्याची कार्यवाही प्रशासकीय स्तरावर झाली आहे का? तसा ठराव कुणी केला असेल तर कोणाच्या संमतीने करण्यात आला असा सवाल करीत शिवप्रतिष्ठानने असा प्रकार करणार्‍या अधिकार्‍यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या रस्त्याचे मूळ नाव गुगल मॅपवर लवकरात लवकर न झळकल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here