काँग्रेस ही सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन चालणारी विचारधारा आहे - ना. नितीन राऊत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

काँग्रेस ही सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन चालणारी विचारधारा आहे - ना. नितीन राऊत

 काँग्रेस ही सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन चालणारी विचारधारा आहे - ना. नितीन राऊत

नगर भेटीत शहर काँग्रेस पदाधिकार्‍यांशी ना.राऊत यांनी साधला संवाद


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः देशात सध्या भाजप सरकारने अनागोंदी निर्माण केली आहे. धार्मिक द्वेष निर्माण केला आहे. अशा स्थितीत देशाला काँग्रेस विचारधारेची गरज असून काँग्रेस विचारधारा ही समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारी विचारधारा असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री ना. नितीन राऊत यांनी केले आहे.
औरंगाबादला जात असताना ना.राऊत काही काळासाठी नगरला शासकीय विश्रामगृहावर शहर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधण्यासाठी थांबले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी त्यांचे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने स्वागत केले. यावेळी आमदार लहू कानडे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, उपाध्यक्ष खलील सय्यद, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. अक्षय कुलट, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, मागासवर्गीय विभाग शहर जिल्हाध्यक्ष नाथा अल्हाट, एससी विभाग प्रदेश समन्वयक संजय भोसले, प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, काँग्रेस नेते फारुक शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ, लोकेश बर्वे, शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, क्रीडा शहर जिल्हा सचिव मच्छिंद्र साळुंखे, क्रीडा विभाग खजिनदार नारायण कराळे, उमेश साठे, अभिनय गायकवाड, शरीफ सय्यद, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस मोसिम शेख आदी उपस्थित होते.
यावेळी ना.नितीन राऊत यांनी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संघटना बांधणीचा कानमंत्र दिला. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. विविध योजनांची विविध विभागांमार्फत अंमलबजावणी सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवावित. तसेच लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. यातूनच काँग्रेस पक्षाचे संघटन देखील मजबूत करावे, असा संदेश या वेळी ना. राऊत यांनी काँग्रेस पदाधिकार्‍यांना दिला. यावेळी शहरातील संघटनात्मक बांधणी आणि कोरोना काळामध्ये महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामाची माहिती किरण काळे यांनी ना. नितीन राऊत यांना दिली. ना.राऊत म्हणाले की, कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता काँग्रेसच्यावतीने शहरामध्ये सुरू असणारी कोविड वॉर रूम लोकांसाठी सातत्यपूर्ण उपलब्ध ठेवावी. या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचे काम काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन यावेळी ना. राऊत यांनी केले.

No comments:

Post a Comment