चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांना सन 2021 चा ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर ग्लोबल पुरस्कार’ जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांना सन 2021 चा ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर ग्लोबल पुरस्कार’ जाहीर

 चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांना सन 2021 चा ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर ग्लोबल पुरस्कार’ जाहीर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरचे प्रख्यात चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांना सन 2021 चा कलामहर्षी बाबुराव पेंटर ग्लोबल पुरस्कार जाहीर झाला आहे. कांबळे यांच्यासह भारतातील तसेच विदेशातील नामांकित 10 कलाकारांचा यंदा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.  आर्ट बिटस् फौंडेशनच्यावीने कलाकारांच्या सन्मानार्थ हे आंतरराष्ट्रीय कला पुरस्कार देण्यात येतात.
नगरचे चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे गेल्या अनेक वर्षांपासून कलाविश्वात ठसा उमटवणारे काम करत आहेत. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर, पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर अशा अनेक दिग्गजांनी कांबळे यांच्या कलाकारीला दाद दिली आहे. चित्रकुट येथे भारतरत्न नानाजी देशमुख यांनी उभारलेल्या नन्ही दुनिया प्रकल्पासाठी कांबळे यांनी प्राणीशिल्पे साकारली आहेत. या कलाकृतीचे देशभरातून कौतुक झाले आहे. कलाजगतच्या माध्यमातून त्यांनी जवळपास तीस वर्षांपासून मातीचे गणपती बनवा ही पर्यावरणपूरक चळवळ चालवली आहे. संपूर्ण देशभरात त्यांची ही चळवळ चांगलीच रूजली आहे. सर्वसामान्यांमध्ये कलात्मक दृष्टीकोन तयार होण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या कलाक्षेत्रातील अत्युच्च योगदानाचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना प्रमोद कांबळे म्हणाले की, कोल्हापूर येथील बाबूराव पेंटर हे कलाक्षेत्रातील सर्वोच्च आदरणीय नाव आहे. बाबुराव यांनी चित्रकला, शिल्पकला, अभिनय, चित्रपटनिर्मिती, नेपथ्य, भित्तीपत्रके अशा विविध कलामाध्यमात अतुलनीय योगदान दिले. त्यामुळेच त्यांना कलामहर्षी हा सन्मान मिळाला. अष्टपैलू कलाकार असलेल्या बाबूराव पेंटर यांनी स्वदेशी कॅमेराही तयार केला होता. 1922 मध्ये कोल्हापुरात चित्रीकरणाच्या वेळी चित्रपट निर्मितिगृहाला एकाएकी आग लागून त्याची राखरांगोळी झाली. तथापि त्या राखेतूनही पुनश्च आपला चित्रपटसंसार बाबूरावांनी उभा केला व चित्रपटनिर्मिती सुरूच ठेवली. त्यांचा कला प्रवास मला नेहमीच प्रेरणादायी ठरलेला आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाने मिळालेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. या पुरस्काराबद्दल प्रमोद कांबळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment