कोपरगाव तालुक्यातील प्रहार मदतीने दिव्यांगांना मिळाले पिवळे रेशन कार्ड वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 25, 2021

कोपरगाव तालुक्यातील प्रहार मदतीने दिव्यांगांना मिळाले पिवळे रेशन कार्ड वाटप

 कोपरगाव तालुक्यातील प्रहार मदतीने दिव्यांगांना मिळाले पिवळे रेशन कार्ड वाटपशिर्डी प्रतिनिधी :

कोपरगाव शहरातील आणि ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते पिवळ्या कार्डचे वाटप करण्यात आले. खूप दिवसापासून लाभधारकांनी त्यांच्या हक्काचे रेशन मिळत नव्हते. त्यासाठी वेळोवेळी अपंग क्रांती चे परमेश्वर कराळे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक श्री.अभिजित कालेकर पा. पाठपुरावा करत होते. यासाठी कोपरगाव चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी रेशन कार्ड लवकरात लवकर अंतोदय करून घ्यावे त्यासाठी आव्हान केले आहे. यावेळी कोपरगाव तहसील कार्यालयातील अन्नपुरवठा अधिकारी श्री गायकवाड, कोपरगाव च्या नायब तहसीलदार सौ कुलकर्णी, आदींचा प्रहार संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर, शहराध्यक्ष प्रवीण भुजाडे यांच्या प्रहार च्या वतीने सत्कार केला. यावेळी मनसे दिव्यांग सेनेचे योगेश गंगवाल, प्रहार अपंग तालुकाध्यक्ष शरद खिल्लारी, कार्याध्यक्ष संदीप काळे, नितीन तीपायले, अक्षय रत्नपारखी, सोनवणे ताई, नसरीन बागवान आदी सह तालुक्यातील दिव्यांग बहुसंख्येने उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here