करोना संसर्गामुळे पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित-सुरेखा भालेकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 25, 2021

करोना संसर्गामुळे पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित-सुरेखा भालेकर

 करोना संसर्गामुळे पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित-सुरेखा भालेकर

वटवृक्षाचे पूजन म्हणजेच सृष्टीचे पूजन..सुचिता वाघमारे.नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

पारनेर:करोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर प्राणवायू परिणामी पर्यावरण संवर्धन,वृक्षलागवड व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याचे प्रतिपादन पारनेर नगर पंचायतीच्या सभापती सुरेखा भालेकर यांनी केले.

        वटपौर्णिमेचे औचित्य साधत प्रभाग क्रमांक दहा मधील महिलांना वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.तसेच नगर पंचायतीच्या वतीने राबवण्यात आलेल्या 'माझी वसुंधरा अभियाना'त सहभागी झालेल्या महिलांचा सुचिता वाघमारे व आशा चेडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात सुरेखा भालेकर बोलत होत्या.

         सभापती भालेकर म्हणाल्या की,भारतीय परंपरेतील प्रत्येक सण व सणांद्वारे देण्यात येणारे संदेश मानवी जीवन समृद्ध करणारे आहेत. वटपोर्णीमेला वडाच्या झाडाचे पूजन करण्याच्या निमित्ताने वृक्ष, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे.करोना संसर्गाने पर्यावरणाचे,स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याचे भालेकर म्हणाल्या.

            आशा चेडे म्हणाल्या की,प्रभाग क्रमांक दहा मध्ये सातत्याने विविध उपक्रम राबवण्यात येतात.उद्योजक अर्जून भालेकर व सुरेखा भालेकर यांच्या प्रयत्नांमुळे प्रभाग क्रमांक दहा शहरात एक आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जातो.करोना संसर्गाच्या काळात भालेकर कुटुंबियांनी कोणताही गाजावाजा न करता प्रभागातील व शहरातील नागरिकांना मदत केली.करोनाबाधितांच्या विलगीकरणासाठी इमारत उपलब्ध करून दिली.प्रभागाचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता यासाठी भालेकर कुटुंब सातत्याने प्रयत्नशील असतात त्यामुळे हा प्रभाग करोनामुक्त झाल्याचे चेडे म्हणाल्या.


वटवृक्षाचे पूजन म्हणजेच सृष्टीचे पूजन

 वटवृक्षाचे पूजन म्हणजेच सृष्टीचे पूजन आहे.वटपौर्णिमेच्या निमीत्ताने शहरी व निमशहरी भागात वडाच्या फाद्यांचे पूजन केले जाते.त्यामुळे पर्यावरणाचा -हास होतो.फांद्याची पूजा करण्याऐवजी शक्य असल्यास वटवृक्षाची अथवा इतर कोणत्याही वृक्षाची लागवड केल्यास पर्यावरणाचे संवर्धन होईल.प्रत्येक कुटुंबाने आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवला तर प्रभाग आणि शहर नियमीतपणे स्वच्छ राहील.आरोग्याच्या समस्या कमी होतील.No comments:

Post a Comment