वाढदिवसानिमित्त विजय कोते यांच्याकडून साईआश्रया अनाथालयात आमरस वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 4, 2021

वाढदिवसानिमित्त विजय कोते यांच्याकडून साईआश्रया अनाथालयात आमरस वाटप

 वाढदिवसानिमित्त विजय कोते यांच्याकडून साईआश्रया अनाथालयात आमरस वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः आपल्या आयुष्यात सदैव साईबाबांची भक्ती, निस्सीम सेवा याबरोबरच सर्वसामान्य तसेच गोरगरीब लोकांसाठी नेहमी काही ना काही मदत करून सामाजिक कार्य करण्यात धन्यता मानणारे साईबाबांच्या पुण्यभुमीतील साईनिर्माण उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष विजय कोते यांच्या वाढदिवसानिमित्त साईआश्रया अनाथालयातील 160 मुलांना 75 किलो आमरसाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक ताराचंद कोते यांनी दिली.
बुधवार दि. 2 जून रोजी साईनिर्माणचे अध्यक्ष विजय कोते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हजारो चाहत्यांनी मोपल मीडियावर सर्वाधिक प्रमाणात शुभेच्छा दिल्या. लॉकडाऊन काळात वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व मित्रपरिवाराने शिर्डीतील अनाथ मुले, त्याचप्रमाणे साईबाबांच्या द्वारकामाई, चावडी तसेच शहरातील भिक्षेकरूंचे तोंड गोड व्हावे या उदात्त हेतूने पुणे जिल्ह्यातील मंचर येथून सुमारे 75 किलो रेडिमेड आमरस आणून त्याचे 300 मिलीचे पॅकिंग बनवून साईआश्रया अनाथलयातील 160 मुलांना वाटप करण्यात आले.
याप्रसंगी साईनिर्माणचे प्रगतिशील शेतकरी तुषार चौधरी यांनी विजय कोते यांच्या वाढदिवसानिमित्त चविष्ट अशा मेजवानी जेवणाची व्यवस्था करून दिली. त्याचप्रमाणे साई सावली अनाथालयातील 25 मुलांना देखील आमरस देण्यात आला असून शिर्डीतील 100 भिक्षेकरूंना हा गोड आमरस देऊन या सर्वांचे तोंड गोड करण्यात आलेॠ यांचा मनस्वी आनंद झाला असल्याचे श्री. कोते यांनी सांगितले.
यावेळी साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या सदस्यांसह साईनिर्माणचे उपाध्यक्ष पंकजं लोढा, तुषार चौधरी, योगेश गायकर, ताराचंद कोते, गोरख कोते, श्री. मोरे, सचिन गोंदकर, बबलू कोते, सुनील लोहकणे, ऋषीके माळी, जितेंद्र रावते, सागर पाडेकर, अमोल सोमवंशी, नितीन गायकवाड, स्वप्निल सोमवंशी, अथर्वराजे कोते, गोकुळ गुंजाळ, सचिन सोमवंशी, महेश नागरे, विजय वाणी, शुभम कोते, सनी त्रिभुवन, मयुर कोते, हर्षद कोते, आकाश कोते, साई संजय कोते, रावते, रवींद्र कोते, प्रतिक कोते आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here