कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात दि.६ रोजी म्युकर मायकोसिसचे तपासणी शिबीर.... कर्जतसह जामखेडच्या रुग्णांचीही होणार तपासणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 4, 2021

कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात दि.६ रोजी म्युकर मायकोसिसचे तपासणी शिबीर.... कर्जतसह जामखेडच्या रुग्णांचीही होणार तपासणी

 कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात दि.६ रोजी म्युकर मायकोसिसचे तपासणी शिबीर.... 

कर्जतसह जामखेडच्या रुग्णांचीही होणार तपासणीनगरी दवंडी

जामखेड:. आमदार रोहित  पवार यांच्या संकल्पनेतून, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांसाठी तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत 'काळी बुरशी' म्युकरमायकोसिस बाबत समुपदेशन व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.६ जुन रोजी हे शिबीर कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत पार पडणार आहे. यावेळी कर्जतसह जामखेड तालुक्यातील रुग्णांचीही तपासणी याच ठिकाणी करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटाशी लढत असताना म्युकरमायकोसिसचे नवे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. या रोगाची रुग्णसंख्या सध्या कमी असली तरी त्यावर वेळीच उपाययोजना म्हणुन आ.रोहित पवार यांच्या नियोजनातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. म्युकरमायकोसिसबाबत होणारे हे राज्यातील पहिलेच शिबीर असावे.नागरिकांनी तपासणी करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here