संपादक तहकीकवर हल्ला करणार्‍यांवर कारवाई करावी ः बोडखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 4, 2021

संपादक तहकीकवर हल्ला करणार्‍यांवर कारवाई करावी ः बोडखे

 संपादक तहकीकवर हल्ला करणार्‍यांवर कारवाई करावी ः बोडखे

पत्रकारांवर हल्लाचा आष्टी तालुका पत्रकार संघाकडून जाहिर निषेध


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकीक यांच्यावर रविवार दि.30 मे  रोजी काळीशाही टाकून धक्काबुक्की करणा-या गुडांवर पत्रकार सरंक्षण कायद्यान्वये कठोर कारवाई करावी अशी मागणी जेष्ठ पञकार उत्तम बोडखे यांनी केली आहे.
आष्टी तालुका पत्रकार संघाच्यावतीने आज मंगळवार दि.1 जुन रोजी नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे यांना दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकीक यांच्यावर झालेल्या निषेधाचे निवेदन आज सोशल डिस्टंन्सिंग पाळून मोजक्याच पत्रकारांच्या उपस्थितीत देण्यात आले.यावेळी जेष्ठ पञकार उत्तम बोडखे बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की,सध्या पत्रकारिता करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे काम झाले आहे.पत्रकारांवर सतत हल्ले होत आहेत.यावर वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.परवा लोकपत्रचे तहकीक यांनी आपल्या वृत्तपत्रात राज्याचे माजी मुख्यमंत्री राणे व पुत्राची वास्तववादी विचार व्यक्त केले होते.त्यामुळे राणे समर्थकांनी संपादक तहकीक यांच्या अंगावर शाही फेकून धक्काबुक्की केली.ही
खुप निंदनीय गोष्ट आहे परंतु पत्रकारांवर असा हल्ला करणा-यांना पत्रकार सरंक्षण कायद्यान्वये कारवाई करावी असेही ते म्हणाले. तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर जेष्ठ पञकार उत्तम बोडखे,गणेश दळवी,प्रविण पोकळे, सचिन रानडे यांच्यासह आदिंच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment