श्रीगोंदे तालुक्यात रविवारी जनता कर्फ्यू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

श्रीगोंदे तालुक्यात रविवारी जनता कर्फ्यू

 श्रीगोंदे तालुक्यात रविवारी जनता कर्फ्यू

श्रीगोंदा तहसील कार्यालयात कोरोना आढावा बैठक
सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत आस्थापना चालू


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः  सर्वत्र थैमान घालणार्‍या कोरोणाच्या संक्रमण कालखंडादरम्यान केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने लॉकडाउन व लसीकरण मोहिमेनंतर कोरोणा प्रादुर्भाव बर्‍या प्रमाणात आटोक्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाने यानंतर 5 टप्प्यात लॉकडाऊन अनलॉक करण्याचा निर्णय घेतला. त्यात अहमदनगर जिल्हा हा पहिल्या टप्प्यात होता. पहिल्या टप्प्यामध्ये सर्व आस्थापना चालू ठेवण्याबाबत निर्णय झाल्यानंतर व्यापार्‍यांनी आज तहसीलदार व प्रांत अधिकारी, आमदार, स्थानिक नगरसेवक, नगराध्यक्ष व सामाजिक, राजकीय पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत निवेदन सादर केले. त्या अनुषंगाने या बैठकीत उपस्थितांनी प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार श्रीगोंदा तालुक्यामध्ये रविवारी पूर्ण वेळ लॉकडाऊन म्हणजे जनता कर्फ्यु ठेवण्याचा तर, सोमवार ते शनिवारी सकाळी सात ते सायंकाळी पाच पर्यंत सर्व आस्थापना चालू ठेवण्याबाबत निर्णय घेतला आहे.

या बैठकीबाबत श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, श्रीगोंदा शहरातील बहुतांश व्यापारी तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आले होते. महाराष्ट्र शासनाने सध्य परिस्थिती पाहून लॉकडाऊन जरी उठवला असला तरी, सर्वांनी कोरोणा संक्रमण वाढणार नाही. याची काळजी घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील जनतेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार श्रीगोंदा तालुक्यात रविवारी जनता कर्फ्यू ठेवण्यात येणार असून, सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व आस्थापना खुल्या ठेवण्यात येणार आहेत. तर पाच वाजल्यानंतर हॉटेल्स पार्सल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी फोन, एसएमएस, व्हाट्सअपच्या माध्यमातून हॉटेल चालकांशी संपर्क करावा. याचप्रमाणे रविवारीही हॉटेल पार्सल सुविधा चालू ठेवण्यात येणार आहे. असे तहसीलदार यांनी सांगितले आहे.
या बैठकीस शहरातील व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते, प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, बाबासाहेब भोस, अण्णासाहेब शेलार, मनोहरदादा पोटे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, संग्राम घोडके, सतीश शेठ बोरा, आनंदशेठ कटारिया सह व्यापारी व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment