राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिना निमित्त कर्जत मध्ये ध्वजारोहण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 10, 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिना निमित्त कर्जत मध्ये ध्वजारोहण

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिना निमित्त कर्जत मध्ये ध्वजारोहण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वा वर्धापन दिन कर्जत येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ध्वजारोहण करून पदाधिकार्यानी राष्ट्रगीत म्हटले व कोरोना मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली.
दि 10 जून 1999 रोजी शरदचंद्र पवार यांनी स्वाभिमानातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.  पवार साहेबांनी सर्व सामान्य कुटुंबातील ज्या व्यक्तीला समाजकारण आणि राजकारणाची आवड आहे अशा तरुण पिढीला पुढे आणण्याचे काम केले. बरीच मंडळी राज्यातील जनतेला अपरिचित होती अशा मंडळींना पवार साहेबांनी ओळख देण्याचे काम केले त्यामाध्यमातून कोण उपमुख्यमंत्री झाले, कोणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तर कोणी कँबिनेट मंत्री पद मिळवले आणि सलग 15 वर्षे आघाडी सरकार मधे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय काँग्रेस बरोबर सरकार चालवले,  त्या माध्यमातून काही मंडळी मोठी झाली आणि 2019 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत असताना बरीच मंडळी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजप मधे सामील झाली. त्यातूनही राष्ट्रवादीने पुन्हा यशस्वी रणनीती आखत राज्यात सत्ता स्थापन केली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मविआ सरकार बरोबर सत्तेत सामील आहे.
कर्जत जामखेड मतदार संघात आ. रोहित पवार यांनी पक्षाच्या अत्यंत कठीण परिस्थितीतून विजय मिळवत नवे पर्व सुरू केले, विधानसभे अगोदर तालुक्यात आलेली पक्षातील मरगळ आ. पवार यांच्या मतदार संघातील आगमनानंतर पक्षाला विशेष ऊर्जा मिळाली असून मतदार संघात विविध विकास कामाच्या माध्यमातून आपली वेगळी दिशा दाखवली आहे, गेली दीड वर्षात पक्ष पातळीवर विशेष लक्ष देत आ. पवार यांनी आपल्या यंत्रणेद्वारे सर्वसामान्य नागरिकांच्या विविध कामांना प्राधान्य दिले असून कोरोना काळात अनेक उपाययोजना द्वारे कठीण प्रसंगात दिलासा दिला आहे. आज राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त डायनामीक स्कुल समोर पक्षाचा झेंडा सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी पक्षाचे कर्जत तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला, कोरोना महामारीच्या  काळात मरण पावलेल्या व्यक्तींना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली, शेवटी राष्ट्रगीताने सांगता झाली यावेळी राजेंद्र गुंड, दिलीप जाधव, युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, अशोक जायभाय, सतिष पाटील, मनिषा सोनमाळी,  दीपक यादव, नाना निकत, रज्जाक झारेकरी, सचिन कुलथे, बापूसाहेब नेटके, डॉ प्रकाशभंडारी,  सचिन मांडगे, भास्कर भैलुमे, बिभीषण खोसे, सुधीर जगताप, ऋषिकेश धांडे, मनोज गायकवाड, नितीन तोरडमल, सचिन धांडे,  सचिन लाळगे, दादासाहेब  चव्हाण,  संतोष मांडगे, तुकाराम राऊत, संजय भिसे, यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्याकडे बघत असून येणार्‍या काळात तरुण पिढीला राष्ट्रवादी काँग्रेसमधे करिअर घडवण्याची चांगली संधी आहे, आ रोहित पवार हे अभ्यासू व दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींना व कार्यकर्त्यांना विशेष बळ देत असल्यामुळे तरुण व तरुणींनी पुढे येऊन काम करावे असे आवाहन सुनील शेलार व विशाल म्हेत्रे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here