खून का बदला खून से... 10 वर्षांपूर्वीच्या हत्येचा घेतला बदला... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

खून का बदला खून से... 10 वर्षांपूर्वीच्या हत्येचा घेतला बदला...

 पॅरोलवरील आरोपीची हत्या; 4 आरोपींना 9 दिवसांची कस्टडी

खून का बदला खून से... 10 वर्षांपूर्वीच्या हत्येचा घेतला बदला...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण येथील माजी सरपंच राजाराम शेळके यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी सुपा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 4 आरोपींना न्यायालयाने 21 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 10 वर्षांपूर्वी नारायण गावचे माजी सरपंच प्रकाश कांडेकर यांचे हत्येतील सध्या पॅरोलवर असलेले  प्रमुख आरोपी राजाराम शेळके वय 65 वर्षे, यांची काल दुपारी निर्घुण हत्या करण्यात आली. खून का बदला खून से.. अशा स्वरूपात या हत्येमागे ‘बदला’ हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याचे दिसून येत आहे.
राजेश भानुदास शेळके भूषण प्रकाश कांडेकर संग्राम प्रकाश कांडेकर सूर्यभान भाऊसाहेब कांडेकर यांना अटक करण्यात आली त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक विनयकुमार गोकावे यांनी झालेली घटनाही पूर्ववैमनस्यातून झाली असून या घटनेचा कट-कारस्थान कुठे रचले व कशाने हत्या केली. त्या संदर्भात पुरावे गोळा करायचे आहेत. काही आरोपींना ताब्यात घ्यायचे आहे. म्हणून पोलिस कस्टडी मिळावी अशी मागणी केली.
आरोपींचे वकील गणेश कावरे यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे जर राजाराम शेळके व राहुल शेळके यांना धमकी दिली जात होती तर यापूर्वीच त्यांनी पोलिसांना कळवले पाहिजे होते.तसेच ताब्यात घेतलेले आरोपी हे घटना घडली त्यावेळी कामानिमित्त बाहेरगावी होते. तसेच पूर्वीची घटना दहा वर्षांपूर्वी घडली आहे. त्यानंतर त्यांच्या विरोधात कोणत्याही पोलीस स्टेशनला फिर्याद नाही. त्यांना कोणतीही गुन्हेगाराची पार्श्वभूमी नाही. घटना घडल्यानंतर पोलिसांनी बोलावल्या नंतर आरोपी स्वतःहून हजर झाले असा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर चारही आरोपींना नऊ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजाराम शेळके यांचे त्यांच्या शेतामध्ये काम करत असताना दि.11 रोजी दुपारी 1 च्या सुमारास अज्ञातांनी हत्या केली ही माहिती पोलिस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचे फिर्याद राहुल राजाराम शेळके यांनी दिली आहे. फिर्यादी मध्ये शेळके यांनी म्हटले आहे की भानुदास शेळके,संग्राम प्रकाश कांडेकर गणेश भानुदास शेळके,सुर्यभान भाऊसाहेब कांडेकर,भुषण प्रकाश कांडेकर, अनिकेत प्रकाश कांडेकर,सौरभ सुर्यभान कांडेकर, अक्षय पोपट कांडेकर , सर्व रा नारायण गव्हाण, ता पारनेर तसेच त्यांचे अज्ञात साथीदार यांनी पुर्व वैमनस्यातुन कट करुन धारदार हत्याराने दि 11 रोजी दुपारी राजाराम जयवंत शेळके, वय 65 वर्ष, यांचेवर वार करुन त्यांना जिवे ठार मारले असल्याची फिर्याद राहुल राजाराम शेळके यांनी दिली आहे यावरून राजेश भानुदास शेळके भूषण प्रकाश कांडेकर संग्राम प्रकाश कांडेकर सूर्यभान भाऊसाहेब कांडेकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे करत आहेत. राहुल राजाराम शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की नारायण गव्हाण येथील आमची शेती कामगारांचे मदतीने करुन घेतो. आमची नारायण गव्हाण शिवारात कॅनालचे आसपास एकुण 36 एकर क्षेत्र आहे मी व माझे वडील राजाराम जयवंत शेळके यांचे विरुदध सन 2010 मध्ये नारायण गव्हाण येथील मयत प्रकाश भाऊसाहेब कांडेकर यांचा खुन झाल्याने त्यामध्ये पोलीस स्टेशन सुपा येथे दाखल असलेल्या गुन्हयात आरोपी करण्यात आले होते सदर गुन्हयाचा तपास पुर्ण झाले नंतर मी, माझे वडील व इतर 12 आरोपीविरुदध दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. सदरच्या गुन्हयात न्यायालयाने आमचे पैकी 5 जणांना दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती व ती शिक्षा मी व माझे वडील भोगत आहोत.सन 2018 मध्ये मी पहिल्या वेळेस पॅरोल रजेवर आलो होतो.तेव्हा मी गावी नारायण गव्हाण येथे शेताकडे कॅनालचे रोडने जात असताना, आमचे गावातील राजेश भानुदास शेळके हा एका चारचाकी गाडीतुन आला व मला पाहुन गाडीतुन उतरला आणि त्याने जमीनीवरील दगडे उचलुन माझे गाडीकडे धाऊन आला व मला घाण घाण शिवीगाळ करीत असल्याने, मी तसाच माझी गाडी पाठीमागे घेऊन परत पुणे येथे निघुन गेलो. त्यादरम्यानच माझे वडील संचित रजेवर आले होते. तेव्हा वडील राजाराम व भाऊ अतुल असे दोघे आमचे नारायण गव्हाण येथील शेतीकडे आले होते. ते कॅनालशेजारी असणा-या आमचे शेतातील घरासमोर उभे असाताना, त्यावेळेस आमचे गावातील राजेश भानुदास शेळके व प्रकाश कांडेकर ची मुले सग्राम प्रकाश कांडेकर ,अनिकेत प्रकाश कांडेकर व भुषण प्रकाश कांडेकर तसेच सुर्यभान भाऊसाहेब कांडेकर, अक्षय पोपट कांडेकर, सौरभ सुर्यभान कांडेकर , व गणेश भानुदास शेळके यांनी हातात कोयते घेऊन कॅनालचे रोडवर आमचे शेतासमोर उभे राहुन वडील राजाराम शेळके व भाऊ अतुल यांना शिवीगाळ केली होती व तुम्ही गावातुन परत जिवंत कसे जाता असे म्हणत होते.असे वडील व भाऊ यांनी त्याच दिवशी घरी आल्यावर मला व घरातील लोकांना सांगितले होते, मी व वडील असे संचित रजेवर असताना वरील नमुद इसमांनी मला व वडीलांना जिवे मारण्याचा कट रचलेला होता, त्यांचे भितीने आम्ही त्यांचेविरुदध पोलीस स्टेशन तक्रार देण्याचे व गावी येण्याचे टाळले होते.
त्यानंतर सन 2019 मध्ये मी व वडील जेव्हा जेव्हा संचित रजेवरअसताना गावी येत असत त्यावेळेस राजेश भानुदास शेळके व प्रकाश कांडेकर ची मुले सग्राम प्रकाश कांडेकर ,अनिकेत प्रकाश कांडेकर व भुषण प्रकाश कांडेकर तसेच सुर्यभान भाऊसाहेब कांडेकर, अक्षय पोपट कांडेकर, सौरभ सुर्यभान कांडेकर,व गणेश भानुदास शेळके हे आम्हाला नेहमी शिवीगाळ ,दमदाटी करीत असत, मी व वडील असे आम्ही, माहे 8 मे 2020 पासुन कोरोना विषाणु साथरोगीचे अनुशंगाने पॅरोल रजेवर आहोत. तेव्हा पासुन मी पुणे येथे कुटुंबासह राहतो व वडील आधुन मधुन गावी शेतीकडे येत असतात. मे 2021 पासुन वडीलांनी गावातील शेतीचे लेव्हलींगचे काम चालु केल्याने ते एकटेच नारायण गव्हाण येथील शेतातील घरातराहत होते.तेथे आम्ही आमचे सुरक्षितेच्या दृष्टीकोणातुन व आमचेवर चुकीचे किंवा खोटे आरोप होऊ नये म्हणुन आमचे शेतातील घराला सी सी टी व्ही कॅमेरे बसाविलेले आहे व त्याचे लाईव्ह कव्हरेज मी व भाऊ अतुल आपापले मोबाईलमध्ये पाहत असतो, वडील रोज माझेशी व घरच्यांशी फोनवर बोलत असत. दि 7 रोजी मला फोन आल्यावर मी त्यांना गावात तुम्हाला कोणी त्रास देत आहे का ? असे विचारले होते.त्यावेळेस त्यांनी सांगितले की, मी शेतात फेर फटका मारीत असताना मला राजेश भानुदास शेळके व संग्राम प्रकाश कांडेकर यांनी त्यांचे शेतात उभे राहुन शिवीगाळ,दमदाटी केली होती व जिवे मारण्याची धमकी देत होते व दगड फेकुन मारीत होते.तसेच सुर्यभान कांडेकर, व प्रकाश कांडेकर यांची मुले आपल्या घराचे जवळुन जाणारे कॅनालचे रोडने चकरा मारीत होते, असे सांगितल्याने मी त्यांना तुम्ही पुणे येथे निघुन या असे सांगितले होते दि 11 रोजी मी पुणे येथे घरी असताना माझा भाऊ अतुल यास आमचे शेतात मुकादम म्हणुन काम करणारा संतोष मच्छिंद्र शेळके याने दुपारी 1.वा चे सुमारास फोन करुन सांगितले की, वडीलांना कोणीतरी शेतात येऊन मारले असुन मी त्यांना शिरुर येथे दवाखान्यात घेऊन जात आहे. तरी तुम्ही लवकर या असे सांगिल्याने, भाऊ अतुल याने ही बातमी मला सांगितली व आम्ही लगेचच शिरुर येथे येण्याकरीता निघालो, प्रवासादरम्यान मी संतोष शेळके यास वडीलांचे तब्येतीबाबत विचारपुस केली असता त्याने वडील मयत झाल्याचे सांगिल्याने मी व भाऊ अतुल असे शिरुर येथील ग्रामीण रुग्नालयात आलो. व तेथे जाऊन पाहिले असता वडील राजाराम जयवंत शेळके यांचे मानेतुन रक्तस्त्राव झालेला दिसत होता व वडील राजाराम जयवंत शेळके यांची तपासणी वैदयकीय अधिकारी ग्रामीण रुग्नालय शिरुर यांनी केली होती व त्यांनी वडील मयत झाले असलेबाबत कळविले होते. असेही फिर्यादीत नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment