संपादक मनोज मोतियानी वरील खोटा गुन्हा रद्द करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

संपादक मनोज मोतियानी वरील खोटा गुन्हा रद्द करा.

 संपादक मनोज मोतियानी वरील खोटा गुन्हा रद्द करा.

संपादक व पत्रकारांच्या शिष्टमंडळाची पोलिस अधीक्षकांकडे मागणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील सायंदैनिक ‘अहमदनगर घडामोडी’ चे संपादक मनोज मोतियानी यांच्यावर काल रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेला खंडणीचा गुन्हा खोटा असून गुन्हा नोंदविणार्‍या फिर्यादीचा ‘बिंगो’ नावाचा जुगार धंदा असून त्याच्यावर अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मोतियानी यांच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करावा यासाठी शहरातील संपादक व पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास वर्ग करून या गुन्ह्याशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
काल शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास काशिनाथ शिंदे यांनी मोतियानी यांना फोन करून ’तुझ्याशी बोलायचे आहे, घरा बाहेर ये, असे म्हणून बाहेर बोलावून घेतले. त्यावेळी शिंदे याने मोतियानी यांच्या डोक्याला रिवाल्वर लावून ’आमच्या बिंगो धंद्याच्या बातम्या का लावतो, दोन नंबरच्या धंद्यामध्ये अडथळा आणतो, तुझा काटा काढतो, तुला गोळ्या घालतो, असे म्हणून झटापट सुरू केली. या झटापटीत मोतियानी यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन काढून घेतली. मी चांगल्या पोलिस अधिकार्‍यांना कामाला लावले आहे, तुला पण कामाला लावतो, अशी धमकी दिली. त्यानंतर मोतियानी यांनी पोलीस निरीक्षक गायकवाड यांना फोन वरून माहिती कळवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळंके हे तेथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी काशिनाथ शिंदे यास ताब्यात घेतले.      वृत्तपत्राचे संपादक आणि बिंगो हा बेकायदा धंदा चालविणार्‍यामधील वाद थेट पोलिसात पोहोचला आहे. दोघांनी एकमेकांविरोधात फिर्याद नोदविल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. काशिनाथ बबन शिंदे (वैदुवाडी, सावेडी) असे बेकायदा बिंगो धंदा चालविणार्‍याचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात मनोज मोतियानी या संपादका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज मोतियानी यांनीही काशिनाथ शिंदेच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
काशिनाथ शिंदे यानेही मोतीयानीचे विरोधात पोलिसात फिर्याद दिली. सकाळी 11 वाजता मोतियानी पानटपरी जवळ आले. वाढदिवसाची जाहिरात पाहिजे, दहा हजार दे, असे म्हणत कमरेला असलेला गावठी कट्टा काढून डोक्याला लावला, व गल्ल्यातून तीन हजार रुपये काढून शिवीगाळ केल्याचे शिंदे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. रात्री अकरा वाजता रोहित ऊर्फ तात्या मिश्रा याच्यासोबत शिंदे मोतियानी यांच्या घराबाहेर गेला. तेथे मोतियानी यांनी दमदाटी करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. संपादक असलेल्या मोतीयानी यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. बिंगो धंदा चालविणार्‍याच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर गुन्ह्यात तत्परता न दाखविणारे पोलीस मात्र पत्रकाराच्या गुन्ह्यात कमालीचे क्टिक झाल्याचे दिसून आले.
संपादक व पत्रकार यांचे शिष्टमंडळात शिवाजी शिर्के, सुभाष चिंधे, बाबा जाधव, अशोक झोटींग, अरुण वाघमोडे, सुभाष मुदळ, मोहनीराज लहाडे, मिलिंद देखणे, सचिन दसपुते, राम नळकांडे, भाऊसाहेब होळकर, अन्सार सय्यद, आबीद दुलेखान, शब्बीर सय्यद, साजीद शेख, शुभम पाचरणे, राजेंद्र येंडे, सागर तनपुरे, भास्कर कोडम, आमीर सय्यद आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment