टॉप सिक्रेट ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 12, 2021

टॉप सिक्रेट !

 टॉप सिक्रेट !


भारतासारख्या विशाल देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान व्हावं हे शरद पवारांचं अनेक वर्षापासूनच स्वप्न आहे. ते त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही पण हे टॉप सिक्रेट आहे. पी.व्ही नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यानंतर पुढील पंतप्रधान शरद पवार असतील अशी चर्चा असतानाच सोनिया गांधी राजकारणात उतरल्यावर हे स्वप्न आता काँग्रेसमधून पूर्ण होणार नाही हे ओळखून पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला. 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना मोठं यश मिळालं यात रणनितिकार प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा होता हे ओळखूनच शरद पवार यांनी किमान 2024 च्या निवडणुकीत तिसरी आघाडी स्थापन करून पंतप्रधानपद मिळविण्याचा संकोच हाती घेतला आहे. कालच्या पवार-किशोर बैठकीतील हे टॉप सिक्रेट आता उघड झाले आहे.

प्रख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील कालची बैठक राजकीय वर्तृळातील अनेकांच्या भूवय्या उंचावणारी होती. यांच्यातील मॅरेथॉन बैठकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही याचे पडसाद पाहण्यास मिळणार आहे. विशेष म्हणजे, या बैठकीबद्दल पूर्वकल्पनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही होती, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काही बदल होणार का अशी चर्चाही आता सुरु झाली आहे. 2019 ला जेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 3 पक्षांनी मिळून सत्ता स्थापन केली होती. तेव्हाच महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदललं होतं. आता पुन्हा काही बदल होणार का शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर हे पाहणे येत्या काळात पाहाणे महत्वाचे असणार आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत काय राजकीय चित्र असणार आहे. याबद्दल प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. नेमकी चर्चा काय झाली याची माहिती अद्याप समोर आली नाही . प्रशांत किशोर यांच्यासोबत राज्यात रणनीती आखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.  महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने नियोजन करावे, काय समीकरण आखले जावे, मतदारसंघनिहाय कसे नियोजन असावे, याबद्दलही किशोर यांनी भाष्य केल्याचं म्हटलं जात आहे.
प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल साडेतीन तास चर्चा केली. ही अत्यंत सिक्रेट मिटींग होती. या बैठकीत भाजपला पर्याय म्हणून तिसरी आघाडी स्थापन करण्यासह भाजपला मात देण्यासाठीच्या व्यूहरचनेवरही चर्चा झाली. एवढेच नव्हे तर भाजपला मात कशी देता येईल?, भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र कसे आणता येईल? भाजपविरोधात उभे ठाकण्याचा समान धागा काय असू शकतो, याचं सादरीकरणच प्रशांत किशोर यांनी पवारां यांना देवून तिसर्‍या आघाडीत द्वारे पंतप्रधानपदाचं गाजर दाखविले आहे. या अत्यंत महत्त्वाच्या भेटीत प्रशांत किशोर यांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत 400 जागांवर मात द्यायची असेल तर  त्या जागा कोणत्या, कोणत्या राज्यात किती जागा आहेत, त्या राज्यात कोणते प्रादेशिक पक्ष मोठी भूमिका बजावू शकतात, याची आकडेवारीच प्रशांत किशोर यांनी पवारांना दिली आहे. तसेच एकट्याच्या बळावर काँग्रेस भाजपला हरवू शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन चालल्याशिवाय पर्याय नाही, हे पवार ओळखून आहेत. देशपातळीवर भाजपविरोधात विरोधकांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युला काय असेल तसे न घडल्यास राज्य पातळीवर विरोधकांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युला काय असावा? याबाबत किशोर यांनी पवार यांना काही टिप्स दिल्या आहेत. प्रशांत किशोर यांनी भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी पवारांनाही प्रादेशिक पक्षांशी संवाद साधून त्यांना एकत्रित आणण्याचा सल्ला दिला आहे. मोदींची लाट असताना आणि भाजप बंगालमध्ये वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी झालेला असतानाही ममता बॅनर्जी यांनी विजय कसा खेचून आणला, त्यासाठी काय रणनीती वापरली याची माहितीही त्यांनी पवारांना दिली आहे. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही महिन्यांपूर्वीच पवार-प्रशांत किशोर यांची भेट होणार होती. मात्र, काही कारणास्तव ही भेट झाली नाही. मात्र, काल झालेल्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. परंतु, भाजपविरोधात राष्ट्रीय स्तरावर मोठी आघाडी निर्माण व्हावी यावर पवार आणि किशोर यांचे एक मत झालं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here