तृतीयपंथियांच्या समस्या आणि तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समितीचे गठण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

तृतीयपंथियांच्या समस्या आणि तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समितीचे गठण

 तृतीयपंथियांच्या समस्या आणि तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समितीचे गठण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत जिल्हयातील तृतीयपंथी यांच्या समस्या तसेच तक्रारी संदर्भात प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर  जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीत सदस्य म्हणून अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, रोजगार  व स्वयंरोजगार अधिकारी, अन्न व नागरी पुरवठा अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, शिक्षण अधिकारी (माध्यमिक), जिल्हा नियोजन अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले सदस्य चंद्रकांत काळोखे, तृतीयपंथीयांसाठी कार्य करणा-या नामवंत संस्थातील दोन तृतीयपंथीय व्यक्ती यामध्ये  काजल  गुरु बाबुनायक नगरवाले, किरण रंगनाथ नेटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक आयुक्त, समाजकल्याण हे या समितीचे सदस्य सचिव असतील. अशी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हास्तरीय  तक्रार निवारण समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे विहीत कालावधीत निवारण करणे. तक्रारींबाबत पडताळणी करुन आवश्यकतेनुसार विभागीय तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळास शिफारस करणे व समितीने तृतीयपंथीयांना भेडसावणा-या अडचणीचा , समास्यांचा व तक्रारींचा सखोल अभ्यास करणे व योग्य त्या उपाययोजना शासनास सुचविणे आदी बाबींवर  ही समिती कार्य करणार आहे. तरी अहमदनगर जिल्हयातील तृतीयपंथीयांनी त्यांच्याअडचणी संदर्भात सहायक आयुक्त समाज कल्याण अहमदनगर या कार्यालयास संपर्क करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त समाजकल्याण  राधाकिसन देवढे यांनी  आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment