जामगांव रस्त्यावर पुलाचे राष्ट्रवादी काँग्रेेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत आ.लंके यांच्या हस्ते भुमिपुजन..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

जामगांव रस्त्यावर पुलाचे राष्ट्रवादी काँग्रेेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत आ.लंके यांच्या हस्ते भुमिपुजन..!

 जामगांव रस्त्यावर पुलाचे राष्ट्रवादी काँग्रेेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत आ.लंके यांच्या हस्ते भुमिपुजन..!

पारनेरच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध  आ. नीलेश लंके यांची ग्वाही नगरी दवंडी

पारनेर  प्रतिनिधी  

पारनेर शहराच्या पाणीयोजनेसह विविध विकासकामे मार्गी लावून शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे आमदार नीलेश लंकेे यांनी सांगितले. 

पारनेर जामगांव रस्त्यावर गावनदीवरील पुलाचे राष्ट्रवादी काँग्रेेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आ. लंके यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आ. लंके यांनी शहरविकासासंदर्भात आपली भुमिका स्पष्ट केली. यावेळी अशोक सावंत, बाबाजी तरटे, सुवर्णा धागडे, अशोक रोहोकले, किसन रासकर, दत्तात्रय खोडदे, डॉ. आबासाहेब खोडदे, सरपंच अ‍ॅड. राहूल झावरे, दिनेश औटी, विलास सोबले, विजय औटी, साहेबराव देशमाने, श्रीकांत चौरे, अमित जाधव, नंदकुमार देशमुख, संजय मते, विक्रम कळमकर, उमाताई बोरूडे, बाळासाहेब औटी आदी यावेळी उपस्थित होते. 

आ. लंके म्हणाले, शहराचा विकास आराखडा तयार करून पाणी योजना, नगरपंचायतीचे सुसज्ज कार्यालय तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विकास आराखडा तयार झाल्यानंतर नगरविकास खात्याकडून हवा तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली  आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विकास कामांना काहीसा ब्रेक लागला असला तरी भविष्यात विकासाचा अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी आपण स्विकारत आहोत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून विकास कामांच्या भुमिपुजनाचे आयोजन करण्यात आल्याबददल समाधान व्यक्त करून आ. लंके म्हणाले, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शिकवणीनुसार आम्ही मतदार संघात काम करीत आहोत. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभुमिवर दोन्ही लाटांमध्ये आपणासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोव्हीड सेंटर तसेच विविध माध्यमातून समाजाची सेवा केली. यापुढील काळातही शरद पवार यांच्या शिकवणीनुसार काम करण्यासाठी  राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सज्ज राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. गुरूवारी सकाळी पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांच्या हस्ते आ. लंके यांच्या संपर्क कार्यालयात ध्वजारोहन करण्यात आले.


No comments:

Post a Comment