स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक असाल तर महामारीवर विजय निश्चित ः डॉ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 21, 2021

स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक असाल तर महामारीवर विजय निश्चित ः डॉ. जगताप

 स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक असाल तर महामारीवर विजय निश्चित ः डॉ. जगताप

मोफत आरोग्य तपासणीने वाढदिवस साजरा स्नेह-75चा उपक्रम  


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जागतिक  महामारीमुळे  आरोग्य हा परवलीचा शब्द झाला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावरच समाजाचे आरोग्य टिकून असल्याने प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी गांभीर्याने घेतली पाहिजे.  त्यासाठी अशा तपासण्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. स्नेह-75 च्या सदस्यांनी वाढदिवस आरोग्य रक्षणाचे साजरा करण्याचा हा एक नवा पायंडा पाडला आहे तो कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन येथील जीवनधारा हॉस्पिटलचे संचालक व मधुमेहतज्ज्ञ डॉ.प्रमोद  जगताप यांनी केले.
येथील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या स्नेह-75 या ग्रुपतर्फे सावेडीतील फुलारी पेट्रोल पंपाचे संचालक कैलास फुलारी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत
मधुमेह तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
 प्रारंभी स्नेह-75 तर्फे श्री फुलारी यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला डॉ. जगताप पुढे म्हणाले,आपल्या आरोग्याबाबत प्रत्येकाने सजग असणे गरजेचे आहे. सध्याच्या जागतिक कोविड-19 सारख्या महामारीच्या काळात प्रत्येकाने आपले आरोग्य सांभाळणे हे सर्वात  महत्त्वाचे व  कौटुंबिक तसेच सामाजिक प्राधान्याचे झाले आहे.
उद्योजक विश्वनाथ पोंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करून या उपक्रमामागील पार्श्वभूमी सांगितली. डॉ. रानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या उपक्रमासाठी  जीवनधारा चे संचालक डॉ. जगताप तसेच सर्व सहकारी यांचे आभार अजित चाबुकस्वार यांनी मानले.
याप्रसंगी दिनेश गुगळे, शैलेंद्र गांधी, अभय गांधी, प्रमोद महाजन, सौ. रजनी ढोरजे,श्री. देवेंद्र डावरे, सौ.जयश्री डावरे व सर्व स्नेह-75 चे सर्व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी फुलारी पेट्रोल पंपाचा सर्व स्टाफ, परिसरातील नागरिक तसेच पेट्रोल पंपावरील ग्राहकांची मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली.

No comments:

Post a Comment