काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेची केलेली सेवा मन भारावून टाकणारी ः काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 21, 2021

काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेची केलेली सेवा मन भारावून टाकणारी ः काळे

 काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेची केलेली सेवा मन भारावून टाकणारी ः काळे

खा.राहुल गांधींचा वाढदिवस संकल्प दिन कार्यक्रमाने उत्साहात साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये असंख्य कोरोना योद्ध्यांनी नगर शहरातील कोरोनाग्रस्तांची सेवा केली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक जबाबदारीतून रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, वेंटिलेटर मिळवून देणे, प्लाजमा मिळवून देणे, जेवण पुरविणे, गरजूंना किराणा किट उपलब्ध करून देणे आदी केलेली जनसेवा ही मन भारावून टाकणारी असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी केले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यालयामध्ये महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या संकल्पनेतून संकल्प दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काळे बोलत होते.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा,  उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ड. अक्षय कुलट, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख,  इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, विद्यार्थी नगर तालुकाध्यक्ष सुजित जगताप, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मोसिम शेख, शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद, सचिव प्रशांत वाघ, सचिव मुबीन शेख, लोकेश बर्वे, माजी नगरसेविका जरीना पठाण, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, उषाताई भगत, काँग्रेस नेते फारुक शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, ऋतिक लद्दे, राहुल गांधी विचार मंचचे सागर
ईरमल, क्रीडा शहर जिल्हा सचिव मच्छिंद्र साळुंखे, क्रीडा विभाग खजिनदार नारायण कराळे, सहसचिव शंकर आव्हाड, प्रशांत जाधव, इम्रान बागवान, अजय मिसाळ, कल्पना खंडागळे, विशाल घोलप, ऋषी खामकर आदी उपस्थित होते.
किरण काळे यावेळी बोलताना म्हणाले की, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरामध्ये काँग्रेसची संघटनात्मक घोडदौड जोरदारपणे सुरू आहे. काँग्रेसमध्ये सातत्याने सुरु असणारे इन्कमिंग यामुळे अनेक जण काँग्रेसच्या वाटेवर आहेत. अनेकांना काँग्रेस पक्षात यावेसे वाटणे हीच पक्षाची आणि कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक कामाची पावती आहे.
यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद म्हणाले की, ज्यांना अनेक वर्ष नगर शहरामध्ये संधी दिली त्यांनी त्या कालावधीमध्ये संघटन वाढवले तर नाहीच उलट पक्षाला चार भिंतीच्या आत बांधून ठेवत पक्षाची वाताहत केली. मात्र किरण काळे यांच्या खांद्यावरती ना. बाळासाहेब थोरात यांनी नेतृत्वाची धुरा सोपविल्यापासून चार-पाच जणांमध्ये अडकलेली काँग्रेस आता शहरामध्ये जनसामान्यांची काँग्रेस झाली आहे. आज काँग्रेस कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्या अपुर्‍या पडत असून कार्यकर्त्यां ची झालेली गर्दी हा काळे यांच्या नेतृत्वाचा विजय आहे.
ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा म्हणाले की, मी पक्षाचा जुना कार्यकर्ता आहे. निष्ठावान आहे. माझ्या सारख्या पक्षातील सर्व जुन्या निष्ठावंतांना बरोबर घेत सन्मानाची वागणूक किरण काळे यांनी दिली. किरणभाऊंच्या जुन्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याच्या व्यापक भूमिकेमुळेच आम्ही सर्व जुने निष्ठावान कार्यकर्ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून नगर शहरामध्ये त्यांची आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जिवाचे रान करू, अशी ग्वाही मी जुन्या निष्ठावान पदाधिकार्यांच्या वतीने आपल्याला देतो असे गुंदेचा यावेळी म्हणाले.
खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अधिपरीचारिका सुरेखा आंधळे, बूथ हॉस्पिटलचे अभिजीत केकान, सुषमा अल्हाट, तुषार पठारे, शिक्षक सुभाष ढेपे सर, रुग्णमित्र नादिर नूर खान आदींचा यावेळी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देत गौरव करण्यात आला.
यावेळी मेजर कळकुंबे म्हणाले की, काळे यांच्या पुढाकारातून ना.बाळासाहेब थोरात यांनी बुथ हॉस्पिटलला म्बुलन्स उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही काँग्रेस पक्षाचे आभारी आहोत. सुरेखा आंधळे म्हणाल्या की, हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून जिल्हा शासकीय रुग्णालयातील माझ्या सर्व शेकडो सहकार्‍यांचा आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अन्वर सय्यद यांनी केले. आभार प्रवीण गीते पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here