रोटरी सेंट्रल, शिंगवी चष्माघर, आनंदऋषीजी नेत्रालयाच्यावतीने मोफत नेत्रतपासणी शिबीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 21, 2021

रोटरी सेंट्रल, शिंगवी चष्माघर, आनंदऋषीजी नेत्रालयाच्यावतीने मोफत नेत्रतपासणी शिबीर

 रोटरी सेंट्रल, शिंगवी चष्माघर, आनंदऋषीजी नेत्रालयाच्यावतीने मोफत नेत्रतपासणी शिबीर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः करोना काळात इतर आजारांवरही चांगले उपचार मिळणे गरजेचे आहे ही बाब ओळखून रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्यावतीने पुढाकार घेण्यात आला आहे. रोटरी सेंट्रल, शिंगवी चष्माघर व आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुक्यातील अकोळनेर जि.प.शाळेत बुधवार दिनांक 23 जून रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता सुरू होणार्या या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आधुनिक कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले व सेक्रेटरी ईश्वर बोरा यांनी दिली.
सुंदर सृष्टी पाहण्यासाठी निर्दोष दृष्टी आवश्यक असते. हाच मंत्र घेऊन रोटरीने ग्रामीण भागात हे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात मोफत शस्त्रक्रिया केल्यानंतर अल्प दरात लेन्स बसवण्यात येणार आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रूग्णांना नगरला ने आण करण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. मोफत औषधोपचार, काळा चष्मा, राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. रूग्णांनी तपासणीसाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. येताना तलाठ्याकडील उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड सोबत आणावे. तसेच जुने रिपोर्ट, सुरू असलेली औषधेही बरोबर आणावीत. शिबीर स्थळी करोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन केले जाणार असून प्रत्येकाने मास्क लावूनच तपासणीसाठी यावे. शस्त्रक्रियेआधी करोना चाचणी रिपोर्ट आवश्यक आहे, अशी माहिती शिंगवी चष्माघरचे अजित शिंगवी यांनी दिली. या शिबिरासाठी सरपंच भास्कर भोर, उपसरपंच प्रतिक शेळके, सोनेवाडी सरपंच स्वाती सुंबे यांचे सहकार्य लाभले आहे.  जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी सेंट्रल, शिंगवी चष्माघर यांच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क: 9890055448, 9823799998, 9284058859, 9657702827, 9822946102

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here