जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने आज वेबिनारचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 5, 2021

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने आज वेबिनारचे आयोजन

 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने आज वेबिनारचे आयोजन

नागरिकांना 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सवलतीच्या दरात रोपेही मिळणार

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः दरवर्षी प्रमाणे दिनांक 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येणार असून परिसंस्थेची हानी रोखत तिचे संतुलन भरुन काढण्याचे प्रयत्न करणे ही या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कार्यक्रमांची व्यापकरित्या अंमलबजावणी करण्याची मर्यादा लक्षात घेऊन सामाजिक वनीकरण विभागीय कार्यालयाच्या वतीने कार्यालय आवारात प्रातिनिधीक वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच 14 परिक्षेत्रामार्फत क्षेत्रीय स्तरावर निवडक ठिकाणी  वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, या दिवशी या विभागाचे अधिनस्त कार्यरत सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय हरित सेना शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, सेवाभावी संस्था, अशासकीय संस्था यांचे सदस्य यांचेकरीता विविध विषयावर मार्गदर्शनपर वेबिनारचे  आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय वन  अधिकारी कीर्ति जमदाडे-कोकाटे यांनी दिली आहे,
सन 2021 च्या पावसाळयात 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वृक्ष लागवड करण्यासाठी सर्व शासकीय आस्थापना तसेच निमशासकीय यंत्रण व लोकांना मोठया प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेता यावा यासाठी  सवलतीचे दरात रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामध्ये,   रोपांचे वर्गीकरण- 9 महिन्याचे रोप (लहान पिशवीतील रोप) (12.5 सेमी ु25 सेमी) वनमहोत्सव कालावधीतील रोप विक्रीचे दर प्रतिरोप  रु. 10,  सर्वसाधारण कालावधीतील रोप विक्रीचे दर प्रति रोप  रु. 21, अठरा महिन्याचे रोप (मोठया पिशवीतील रोप) (20 सेमी ु 30 सेमी) वनमहोत्सव कालावधीतील रोप विक्री दर प्रतिरोप  रु. 40, सर्वसाधारण कालावधीतील रोप विक्री दर प्रति रोप  रु. 73, अठरा महिन्याचे रोप (मोठया  पिशवीतील रोप) (25 सेमी ु40 सेमी) वनमहोत्सव कालावधीतील रोप विक्री दर प्रतिरोप  रु. 50 तर सर्वसाधारण कालावधीतील रोप विक्रीचे दर प्रति रोप  रु. 105 असे असणार आहेत. तरी, अहमदनगर जिल्हयातील नागरिकांनी उपलब्ध क्षेत्रावर जास्तीत जास्त वृक्षारोपण करुन पर्यावरण पूरक उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वेबिनार मध्ये सकाळी 11 वाजता पारंपरिक बियाणे जतन व संवर्धन करणे काळाची गरज या विषयावर पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे , सकाळी 11-40 वाजता महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या विविध योजनांबाबत सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी भास्कर पवार आणि दुपारी 12-45 वाजता कृषिवानिकी रोपवन नमुने या विषयावर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कृषी वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. बी.आर. नजन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती श्रीमती जमदाडे-कोकाटे यांनी दिली..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here